Team India: यावर्षी टीम इंडिया खेळणार एवढे सामने! BCCI चे भरगच्च वेळापत्रक जाहीर

Last Updated on January 2, 2023 by Taluka Post

Team India: टीम इंडिया खेळणार वर्षात ३५ वन-डे! २०२३ चे भरगच्च वेळापत्रक

Team India: रविवारपासून सुरू झालेले २०२३ हे नवीन वर्ष भारतीय क्रिकेटसाठी विशेष असून या वर्षभरात टीम इंडिया ३५ वन-डे सामने खेळणार आहे. १६ वर्षांनंतर प्रथमच भारतीय संघ इतक्या मोठ्या प्रमाणात वन-डे खेळणार आहे.Team India भारतीय क्रिकेट संघ २०२३ मध्ये श्रीलंकेविरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिकेने आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. हे वर्ष संघासाठी खूप महत्त्वाचे असेल. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे २०२३ मध्ये होणारा एकदिवसीय विश्वचषक जो केवळ भारतात होणार आहे. याशिवाय आशिया कप आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल ही होणार आहे.

?आमचा WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?

भारत विरुद्ध श्रीलंका

श्रीलंकेचा संघ २०२३ मध्ये तीन टी- २० आणि तीन वन डे सामन्यांची मालिका खेळण्यास भारताच्या दौऱ्यावर येत आहे. ही मालिका ३ जानेवारीपासून सुरू होईल.

भारत विरुद्ध न्यूझीलंड

न्यूझीलंडचा(NZ) संघ जानेवारीच्या अखेरीस मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी भारतात येणार आहे. NEW ZEALAND CRICKET यादरम्यान तीन वन डे आणि तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

ऑस्ट्रेलिया संघफेब्रुवारी-मार्चमध्ये भारत दौऱ्यावर येणार आहे. यादरम्यान ४ सामन्यांची कसोटी CRICKET AUSTRALIA मालिका खेळवली जाणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठण्यासाठी टीम इंडियासाठी ही मालिका खूप महत्त्वाची आहे. यानंतर दोन्ही संघांमध्ये ३ सामन्यांची एकदिवसीय(ODL)मालिकाही खेळवली जाणार आहे.

आयपीएल

INDIAN इंडियन प्रीमियर लीग PREMIER २०२३ एप्रिल-मे मध्ये LEAGUE खेळवली जाईल. १० संघांची(10 Team) ही लीग दोन महिने चालणार आहे. या काळात भारतीय खेळाडूंचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट (International Cricket)जवळपास बंद असेल.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना जूनमध्ये इंग्लंडमधील ओव्हल क्रिकेट स्टेडियमवर खेळवला वाईल सध्या ऑस्ट्रेलियाचे अंतिम फेरीतील स्थान जवळपास निश्चित झाले आहे. त्याचबरोबर टीम इंडियाही मजबूत स्थितीत आहे. याशिवाय श्रीलंका(SL) आणि दक्षिण आफ्रिका शर्यतीत आहेत.

जुलै-ऑगस्टमध्ये भारताचा वेस्ट इंडिज दौरा

टीम इंडिया जुलै-ऑगस्टमध्ये वेस्ट इंडिजचा दौरा करणार आहे. यादरम्यान दोन सामन्यांची कसोटी, CRICKET तीन सामन्यांची वन-डे आणि तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाईल.

आशिया कप २०२३

पाकिस्तान हा २००८ नंतर CUP प्रथमच २०२३ मध्ये आशिया कपचे यजमानपद भूषवणार आहे. मात्र, दोन्ही देशांमधील तणावामुळे टीम इंडिया पाकिस्तानचा दौरा करणार का? असा प्रश्न आहे. बीसीसीआयचे सचिव आणि आशिया क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शहा यांनी ही स्पर्धा तटस्थ ठिकाणी आयोजित करण्याबाबत सुचवले आहे, पण त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही.

सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा

ऑस्ट्रेलियन वन डे विश्वचषक स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने सप्टेंबर २०२३ मध्ये तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारताचा दौरा करणार आहे.

ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये वन डे विश्वचषक

एकदिवसीय विश्वचषक(World Cup) ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये भारतात आयोजित केला जाणार आहे. २०११ मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया CRICKET WORL शेवटच्या वेळी वर्ल्ड चॅम्पियन बनली होती..

नोव्हेंबर-डिसेंबर ऑस्ट्रेलियाचा तिसरा भारत दौरा

नोव्हेंबर – डिसेंबर २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ एकाच वर्षात तिसऱ्यांदा भारतात येणार आहे. दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची कसोटी(Test Series) मालिका खेळवली जाणार आहे.

डिसेंबर: टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिका दौरा

२०२३ च्या शेवटी टीम इंडिया द. आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. दोन्ही संघांमध्ये दोन कसोटी सामने, SA CRICKET तीन वन डे आणि तीन टी-२० सामन्यांची मालिका होणार आहे. हा दौरा जानेवारी २०२४ मध्ये संपेल.

हेही वाचा: INDvsAUS Test: भारत दौऱ्यात सराव सामने नको- मॅकडोनाल्ड

Comments are closed.