Last Updated on December 23, 2022 by Jyoti S.
IPL 2023 : आयपीएल २०२३ साठी आज मिनी लिलाव; ४०५ खेळाडूंवर लागणार बोली
नवीन वर्षाचे आगमन जवळ येईल तसे आयपीएलची(IPL 2023) उत्सुकता वाढत जाते, पण आयपीएलपूर्वी होणान्या लिलावात उत्कंठा असते. आयपीएल २०२३ च्या सत्रासाठी मिनी लिलाव कोची येथे आज होणार आहे. यामध्ये ८७ साठी ४०५ खेळाडू आपले नशीब आजमावतील. १० संघांमधून सर्वोत्कृष्ट खेळाडू निवडण्याची लढाई होणार आहे. बेन स्टोक्स, सॅम कुरेन, कॅमेशन ग्रीन, केन विल्यम्सन आणि जो रूट यांसारखे अनेक हाय-प्रोफाईल खेळाडू यावर्षी खेळाडूंच्या पूलमध्ये आहेत. क्रिकेटपटूंवर धनवर्षाव करणाऱ्या या लिलावात यंदा कोण तुपाशी जेवणार आहे तर कोण उपाशी राहणार याबाबत चाहत्यांमध्येही उत्सुकता आहे.
आमचा WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
आयपीएल(IPL 2023) मिनी लिलावाद्वारे संघटनांना त्यांच्या फ्रेंचाईझीमध्ये काही नवीन चेहरे जोडण्याची संधी मिळते. इंग्लंड संघातील अनेक स्टार खेळाडू टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर फार्मात आले आहेत. यामध्ये हरी ब्रूकसारख्या युवा स्टारचा समावेश आहे. लिलावादरम्यान फ्रेंचाईझीमध्ये तीव्र स्पर्धा होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा: IPL 2023: आयपीएल-2023 ची तारीख ठरली, यंदा आठवडाभर उशिरा सुरु होणार स्पर्धा..
सनरायझर्स हैदराबाद ४२.२५ कोटी रुपयांच्या सर्वात मोठ्या पर्ससह मिनी लिलावात प्रवेश करेल, तर पंजाब किंग्ज ३२.२ कोटी आणि लखनी सुपरजायंट्स २३.३५ कोटी रुपयांसह उरले आहेत. पर्सच्या बाबतीत हे दोघे अनुक्रमे दुसन्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. दोन वेळचा चैम्पियन कोलकाता नाईट रायडर्सकडे फक्त ७.०५ कोटी रुपये आहेत, तर रॉयल चॅलेंजर्सकडे ८.७५ कोटी रुपये आहेत.
हेही वाचा:IPL 2023 Auction: मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या पाच खेळाडूंवर मोठी बोली लावू शकतात