जानोरीत बायोडिझेल निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त

Last Updated on November 23, 2022 by Jyoti S.

पोलिसांच्या छाप्यात कोट्यवधींचे बेकायदा इंधन जप्त.

कारखाने आणि वेअर हाउस तपासणीची मागणी

जानोरी एमआयडीसीमध्ये यापूर्वीही बेकायदेशीर घटना समोर आल्या आहेत. केमिकल कारखाने आणि वेअर हाऊस या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असल्याने येथूनच काळा बाजार केला जात असल्याचे बोलले जात आहे. मध्यंतरी रेशनच्या गव्हाचा अवैध साठा आणि बनावट सॅनिटायझर निर्मितीने ही वसाहत चर्चेत आली होती. त्यापाठोपाठ मानवी जीवितास धोका पोहचविणाऱ्या इंधन निर्मितीची धक्कादायक बाब समोर आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून, स्थानिक पातळीवर सर्व कारखाने आणि वेअर हाऊसची तपासणी करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

जानोरी : दिंडोरी तालुक्यातील’ जानोरी औद्योगिक वसाहतीत बेकायदा इंधन निर्मितीचा प्रकार समोर आला आहे. ग्रामीण पोलिसांच्या भरारी पथकाने छापा टाकून हा कारखाना उद्ध्वस्त केला असून, या कारवाईत पाच जणांना बेड्या ठोकत पोलिसांनी कोट्यवधी रूपये किमतीचे डिझेल सदृश ज्वलनशील पदार्थाचा साठा जप्त केला आहे.

अनिल भवानभाई राधाडिया (वय बील 37 रा. सुरत, गुजरात), दीपक सूर्यभान – दार गुंजाळ (वय 41, रा. कोणार्क नगर, नद्ध नाशिक), इलियास सज्जाद चौधरी( वर (वय 43, हल्ली रा. कुर्ला मूळ उत्तर. ना प्रदेश), अब्रार अली शेख (वय 37, रानार शिवडी, ), तसेच अजहर इब्रार हुसेन (वय 21, रा. नरसिंग गड ता.राणीगंज जि. प्रतापगड उत्तर प्रदेश) अशी एक अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे असून, चौधरी चालक तर शेख हा क्लिनर आहे.

पोलीस अधीक्षक शहाजी उमाप घरी यांच्या आदेशान्वये पोलिसांनी जिल्ह्यातील अवैध आहे. स्थानिक इं 7, गुन्हे शाखेस मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. जानोरी औद्योगिक वसाहतीतील एका पत्र्याच्या शेडमध्ये बायोडिझेलची निर्मिती केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून छापा असता हा धक्कादायक प्रकार समोर आला. प्लॉट नं.16 मधील कान्हा इंटरप्राईजेस या कारखान्याच्या एका पत्र्याच्या शेडमध्ये संशयित अवैधरित्या डिझेल सदृश पदार्थामध्ये एक ज्वलनशील पदार्थाची भेसळ करीत असताना मिळून आले. गिनॉल – 1214/30 एचसी बल्क नावाचे केमिकल व एमएडीएसओ बी 80 या नावाचे केमिकल आहे. संशयितांच्या ताब्यातून दोन टँकर (क्र. जीजे 12 बीझेड 8825 व एमएच 43 बीजी 7969) या दोन केमिकलने भरलेले टँकर व प्लास्टिक टाक्या भरलेले ज्वलनशील पदार्थ व इतर साहित्य असा एक कोटी एक लाख 68 हज़ार 240 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संशयितांसह मुद्देमाल दिंडोरी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला असून, याप्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पांडूरंग कावळे अधिक तपास करीत आहेत.हेही वाचा: श्रद्धा वालकर हत्याकांड : आफताबवर थर्ड डिग्री नको

Comments are closed.