
Last Updated on December 6, 2022 by Jyoti S.
बीजिंग : कोकेन हा एक अमली पदार्थ आहे. कोकेनचे जास्त प्रमाणात सेवन करून काही लोक नशा करतात. मात्र या कोकेनचा कित्येक वर्षांपासून अनेक प्रकारच्या औषधांमध्ये वापर केला जात आहे. कोका लिव्हजपासून कोकेन तयार केले जाते. मात्र चिनी वैज्ञानिकांनी पहिल्यांदाच तंबाखूच्या पानांपासून कोकेन तयार करण्यात यश मिळवले आहे.
चीनच्या ‘कुनमिंग इन्स्टिट्यूट ऑफ बॉटनी’च्या वैज्ञानिकांनी ही करामत करून दाखवली आहे. तंबाखूच्या पानांपासून कोकेन तयार करण्याची प्रक्रिया अत्यंत जटील आहे. या वैज्ञानिकांनी तंबाखूच्या पानांपासून कोकेन व्यतिरिक्त अन्य औषधी उपयोगी द्रव्ये तयार केली आहेत.आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
काय आहे कोकेन ?
कोकेन एक प्रकारचा कार्बनिक अणू आहे. हा अणू ट्रोपेन एल्कलॉईड्स श्रेणीमध्ये मोडतो. ज्या वनस्पती पूर्णपणे शाकाहारी असतात अशा वनस्पतींच्या पानांपासून हा कोकेन मिळवता येतो. कित्येक वर्षांपासून कोका लिव्हजची लागवड कोकेन मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. जुन्या काळात लोक कोका लिव्हज चावून खात असत. त्यामुळे त्यांना ताजेतवाने वाटत असे. हा एक प्रकारचा सौम्य नशेचा प्रकार आहे. सध्या कोकेनचा उपयोग गंभीर आजारी किंवा शस्त्रक्रिया करण्यापूर्वी रुग्णाला अनेस्थेशिया देण्यासाठी केला जातो.
Comments are closed.