Crime news : नागरिकांनो सतर्क राहा,दुधात होतेय जोरदार भेसळ पोलिसांना खबर देऊन भांडाफोड व्हिडीओ पहा

Last Updated on May 29, 2023 by Jyoti Shinde

Crime news

Crime news : डोंबिवलीत दुधात भेसळ करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. माजी नगरसेवकाला दुधात भेसळ असल्याचा संशय होता. त्यांनी पोलिसांच्या मदतीने दूध भेसळीचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे..

व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

डोंबिवली : डोंबिवलीतील जिमखाना रोडवर असलेल्या टेम्पो नाका परिसरातील मोहन प्लाझा इमारतीत गेल्या तीन महिन्यांपासून दुधात भेसळीचा धंदा सुरू असल्याची माहिती माजी नगरसेवक महेश पाटील यांना मिळाली. रविवारी पहाटे पाटील यांनी सहकाऱ्यासह भेसळयुक्त दुधाचा(Crime news) डबा फोडला. तसेच ही माहिती पोलिसांना देताच टिळकनगर पोलिसांनी एका व्यक्तीला अटक करून पुढील कारवाई सुरू केली.

हेही वाचा: Kharip kanda anudan 2023 : कांदा अनुदान ₹350 मिळवण्यासाठी येथे अटी व शर्ती पहा

महेश पाटील यांनी रविवारी पहाटे पाचच्या सुमारास या ठिकाणी छापा टाकून संपूर्ण प्रकरण उघडकीस आणले. सोबतच या संपूर्ण प्रकरणाची माहिती टिळकनगर पोलिसांनाही देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून दुधात भेसळ करणाऱ्या रमेश मलप्पा गणपत्ती याला अटक(Crime news) केली. अधिक चौकशी केली असता तो गेल्या तीन महिन्यांपासून भेसळयुक्त दुधाची विक्री करत असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी या ठिकाणाहून 40 लिटर भेसळयुक्त दूध जप्त केले.

टिळक नगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग पीठ यांनी सांगितले की, आरोपी रमेश मलप्पा गणपत्ती याच्यावर कलम २६९, २७०, २७२ नुसार कारवाई करण्यात आली आहे. याबाबत महेश पाटील म्हणाले की, दुधाच्या पिशव्यांमध्ये भेसळ करण्याचे काम अनेक दिवसांपासून सुरू होते. या संदर्भात दोन दिवसांपूर्वी येथील नागरिकांकडून माहिती घेतली असता, रविवारी पहाटे पाच वाजता असा काही प्रकार सुरू झाला.

हेही वाचा: kanda anudan dada bhuse : कांदा अनुदानाबाबत महत्त्वाची बातमी; आता ‘या’ दिवशी खात्यात जमा होणार रक्कम, मंत्री दादा भुसेंनी थेट तारीखच सांगितली

मी स्वतः तेथे जाऊन तपासणी केली असता दुधाच्या पिशव्यांमध्ये मेणबत्त्या ठेवून पाण्यात भेसळ करण्याचा प्रकार समोर आला आहे. हा सर्व प्रकार जिमखाना रोडवरील मोहन प्लाझा इमारतीत सुरू होता. ही माहिती पोलिसांना(Crime news) देण्यात आली असून पोलिसांनी सर्वांना अटक करून आपल्यासोबत नेले आहे. मात्र दूध आरोग्यासाठी चांगले आहे, असे आम्ही मुलांना सांगत असतो, मात्र अशा प्रकारच्या भेसळयुक्त दुधामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ केला जात आहे. त्यामुळे दुधात भेसळ करणाऱ्यांवर कडक शासन करून कठोर कायदा आणावा, अशी मागणी मी स्वत: सरकारकडे करतो, अशी मागणी माजी नगरसेवक महेश पाटील यांनी केली.

Comments are closed.