Last Updated on December 22, 2022 by Jyoti S.
Crime of gutkha :माउथ फ्रेशनरच्या नावाखाली गुटखा तस्करी: ट्रकसह ४४ लाखांचामुद्देमाल जप्त
■ अन्न व औषध प्रशासनाची कारवाई
माउथ फ्रेशनरच्या(Crime of gutkha) गोण्यांखाली गुटख्याचे पाकिटे दडवून परराज्यातून नाशिकमार्गे चोरटी वाहतूक करणाऱ्या ट्रकमधून पथकाने १६ लाख ५८ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. या कारवाईत १३ लाखांचे माउथ फ्रेशनर व १५ लाखांचा ट्रक असा मुद्देमालही जप्त केला आहे. अन्न व औषध प्रशासनाने आयशर ट्रकचालक, क्लिनर, ट्रकमालक व वाहतूकदारांविरुद्ध अंबड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
अरुण राठोड (ट्रकचालक, रा. इंदूर), सुनील मौर्या (क्लिनर, रा. गुजरी धामनोद जि. धार), वाहनमालक मुकेश राठोड (हा रा. धुळे), यामध्ये वाहतूकदार-एमपी नॅशनल रोडवेज, इंदूर तसेच नदीम गोलंदाज व दिलीप बदलानी संशयितांची नावे दिली आहेत. नाशिकहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मालट्रकमधून पानमसाला व सुगंधित तंबाखूच्या साठ्याची वाहतूक होत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या नाशिक कार्यालयास मिळाली होती. त्यानुसार पथकाने एमएच १८ बीजी ४०४४ क्रमांकाच्या ट्रकचा पाठलाग करून विल्होळी जवळील बटरफ्लाय गार्डन जवळ ट्रक अडवला. ट्रकची तपासणी त्यांनी केली असता माउथ फ्रेशनरच्या(Crime of gutkha) गोण्यांमध्ये प्रतिबंधित असलेल्या गुटख्याचा साठा आढळून त्यांना आला. हेही वाच: Sinner-shirdi : मृत गोवंशच्या अवशेषांची वाहतूक
अन्नसुरक्षा अधिकारी प्रमोद पाटील यांनी फिर्याद दिली असून, अन्न सुरक्षा आयुक्त अभिमन्यू काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहआयुक्त (नाशिक) गणेश परळीकर, सहायक आयुक्त (अन्न) उदय लोहकरे, विवेक पाटील तसेच अन्न सुरक्षा अधिकारी अविनाश दाभाडे, योगेश देशमुख व गोपाळ कासार, नमुना सहायक विकास विसपुते, चालक निवृत्ती साबळे यांनी ही कारवाई केली.