Last Updated on January 3, 2023 by Jyoti S.
Delhi Girl Murder: आरोपी भाजपशी संबंधित; पोलिस ठाण्यासमोर आपची निदर्शने
दिल्लीतील सुलतानपुरी भागातील कांझावाला येथे एका तरुणीला(Delhi Girl Murder) कारद्वारे १२ किलोमीटर फरफटत नेण्याच्या घटनेत भाजपचा एक पदाधिकारी असून, त्यामुळे या प्रकरणी पोलिसांनी सौम्य कलमांखाली गुन्हे दाखल केले, असा आरोप आपचे आमदार सौरभ भारद्वाज यांनी केला आहे.
पाचही आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी, यासाठी आपने सोमवारी सुलतानपुरी पोलिस ठाण्यासमोर निदर्शने केली. तसेच सुलतानपुरी पोलिस ठाण्यासमोर मनोज मित्तलचे पोस्टर्स आपच्या कार्यकर्त्यांनी लावले. सध्या आरोपींवर निष्काळजीपणाने वाहने चालविण्याचे कलम ३०४ ए नुसार गुन्हा नोंदविला आहे.
भाजपची कबुली
मनोज मित्तल हा सुलतानपुरी(Delhi Girl Murder) भागात भाजपच्या डाटा एंट्री सेलमध्ये सहसमन्वयक असल्याची कबुली भाजपचे प्रवक्ता हरीश खुराणा यांनी दिली आहे. चौकशीमध्ये पोलिसावर कोणताही दबाव नसून आरोपींवर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी खुराणा यांनी केली आहे. या घटनेत पोलिस क्राइम सीन पुन्हा तयार करणार आहेत.
हेही वाचा : Pune pimpari: सराईत गुन्हेगारांचा चक्क कोयत्याने नागरिकांवर हल्ला; पोलिसांनी पाठलाग केला अन….