
Last Updated on August 15, 2023 by Jyoti Shinde
Ethiopia Blast
इथियोपिया एअर स्ट्राइक: इथियोपिया देशात सध्या भयानक हिंसाचार सुरू आहे. काही दिवसांपासून स्थानिक टोळ्या आणि देशाचे सैन्य यांच्यात मोठ्या प्रमाणात चकमक सुरू आहे. त्यातच रविवारी देशातील सेलम भागात मोठा स्फोट झाला. यामध्ये 26 जणांचा जीव गेल्याची बाब समोर आली आहे.
फिनोट सेलम या जनरल हॉस्पिटलचे सीईओ मनये तेनाव यांनी ही संपूर्ण माहिती दिलेली आहे. त्यांनी सांगितले की, रविवारी या भागात झालेल्या स्फोटात आतापर्यंत २६ जणांचा मृत्यू झाला आहे. 50 जणांवर अजूनही उपचार सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या स्फोटापूर्वीही हिंसाचारात जखमी झालेल्या 160 जणांवर या रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत.Ethiopia Blast
3 ऑगस्ट रोजी अम्हारा प्रांतातील सैनिक आणि फानो नावाच्या स्थानिक सशस्त्र गटामध्ये संघर्ष झाला. इथिओपिया सरकारने 4 ऑगस्ट रोजी अम्हारा प्रदेशात सहा महिन्यांची आणीबाणी जाहीर केली. यानंतर प्रकरण चिघळले.
मानवाधिकार आयोगाने चिंता व्यक्त केली
इथिओपियाच्या मानवाधिकार आयोगाने या प्रकरणावर चिंता व्यक्त केली आहे. अम्हाराच्या या अनेक भागामध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार झालेला आहे. अनेक लोकांचा मृत्यू झाला असून सार्वजनिक मालमत्तेचेही नुकसान झाले आहे. सालेम, बहीर दार, गोंडर अशा अनेक प्रांतात अराजकतेचे वातावरण आहे.Ethiopia Blast
९ ऑगस्टनंतर येथे सुरू असलेला हिंसाचार कमी झाला होता. मात्र, रविवारच्या उद्रेकाने आणखी एक खळबळ उडाली आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलिया, जपान, ब्रिटन, न्यूझीलंड आणि अमेरिकेने इथिओपियामधील त्यांच्या नागरिकांसाठी संयुक्त निर्देश जारी केले आहेत. या नागरिकांच्या सुरक्षेसाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.