
Last Updated on November 23, 2022 by Jyoti S.
भयावह वास्तवावर संयुक्त
राष्ट्रप्रमुखांनी व्यक्त केली चिंता
संयुक्त राष्ट्र : जगात प्रत्येक 11 व्या मिनिटाला एक महिला तथा मुलीची तिच्या जवळचा साथीदार किंवा कुटुंबातील सदस्यांकडून हत्या होत असल्याचे विदारक वास्तव संयुक्त राष्ट्रप्रमुख अँटोनियो गुटारेस यांनी अधोरेखित केले. श्रद्धा वालकरची तिच्या प्रियकराने केलेल्या निर्घृण हत्येने भारत हादरलेला असताना गुटारेस यांनी हे वक्तव्य केले आहे. महिलांविरोधातील हिंसाचार जगातील सर्वात मोठे ‘मानवाधिकार उल्लंघन’ आहे. त्यामुळे या समस्येचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय कृती योजना लागू करण्याचे आवाहन गुटारेस यांनी देशांना केले.
जगभरात येत्या शुक्रवारी आंतरराष्ट्रीय महिलांविरोधातील हिंसाचार निर्मूलन दिन साजरा
राष्ट्र अर्थात यूएनचे महासचिव अँटोनिया गुटारेस यांनी महिलांविरोधातील वाढत्या हिंसाचारावर बोट ठेवले. जगात महिला आणि मुलींविरोधातील हिंसाचार सर्रासप सर्वात मोठे ‘मानवाधिकार उल्लंघन’ आहे. प्रत्येक लागत ११ मिनिटांमध्ये एक महिला तथा मुलीचा तिच्या प्रतिमेच जवळचा साथीदार किंवा कुटुंबातील सदस्याकडून जीव घेतला जात आहे. कोरोना महामारीपासून ते वाढत आर्थिक चढ-उतार हे निःसंशयपणे शारीरिक व मौखिक दुर्व्यवहाराचे कारण बनत असल्याचे म्हणाले. अर्ध्याहून अधिक लोकसंख्येला भेदभाव, गरज हिंसाचार आणि दुर्व्यवहाराची भारी किंमत मोजावी लागत आहे
प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला व तरुणींना याचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे त्यांच्या मूलभूत अधिकारावर गदा येत असून, आर्थिक वृद्धी खुंटत असल्याचे गुटारेस म्हणाले. महिला व युवतींना सर्रासपणे ऑनलाईन हिंसेचादेखील सामना करावा लागत आहे. यात लैगिंक अत्याचारापासून ते तिच्या प्रतिमेचा गैरवापर आणि आदी बाबींचा कडून समावेश आहे. महिलांविरोधात वाढत्या हिंसाचाराला आळा घालण्यासाठी देशांनी राष्ट्रीय कृती योजना राबवण्याची गरज आहे. तसेच महिला अधिकारासाठी झटणाऱ्या संघटना चा व चळवळींचा निधी 2026 सालापर्यंत 50 टक्क्यांनी वाढविण्याचे आवाहन त्यांनी केले.
जगात प्रत्येकाने महिलांच्या अधिकाराबाबत खंबीरपणे उभे राहात गर्वाने आपण स्त्रीवादी असल्याची घोषणा केली पाहिजे. त्याचबरोबर पितृसत्ताक नियमांना आव्हान देणाऱ्या सार्वजनिक मोहिमांना पाठिंबा देण्याचे आवाहन गुटारेस यांनी केले. यंदा महिला आणि मुलींवरील हिंसाचार समाप्त करण्यासाठी सक्रियपणे एकत्रित येण्याच्या संकल्पनेवर आधारित ‘आंतरराष्ट्रीय महिलांविरोधातील हिंसाचार निर्मूलन दिन साजरा केला जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले. हेही वाचा : चार वर्षीय बालकाचा संशयास्पद मृत्यू
Comments are closed.