Last Updated on April 4, 2023 by Jyoti S.
Indian Railway station
थोडं पण महत्वाचं
भारतीय रेल्वे(Indian Railway station): या स्थानकावर दररोज नियमित गाड्या थांबतात. आणि हे रहिवासी या गाड्यांची रोज तिकिटे काढतात पण हो प्रवास मात्र…
भारतीय रेल्वेची मनोरंजक वस्तुस्थिती(Indian Railway station): बरेच लोक ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी तिकीट न घेण्याचा प्रयत्न करतात. भारतीय रेल्वेने प्रवास करणे हा जगातील सर्वात स्वस्त सार्वजनिक वाहतुकीपैकी एक आहे आणि तरीही असे अनेक प्रवासी आहेत ज्यांना तिकीट न घेण्याचे धाडस वाटते. पण असं म्हणतात की प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात.
हेही वाचा: 1 April Changes 2023 : स्मार्टफोनपासून सिगारेटपर्यंत, १ एप्रिलपासून काय काय महाग आणि काय स्वस्त; पहा
मोफत प्रवास शोधणाऱ्यांचे जसे गट आहेत, तसेच भारतात प्रामाणिक लोकही आहेत. भारतातील रेल्वे स्टेशन परिसरात राहणारे लोक इतके कर्तव्यदक्ष आहेत की त्यांना ट्रेनने प्रवास करायचा नसला तरी ते दररोज स्टेशनवर जाऊन ट्रेनचे तिकीट खरेदी करतात.
आता या मागचे खरे कारण काय ते पाहू.
देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या आदेशानुसार प्रयागराजजवळील दयालपूर स्टेशन तत्कालीन रेल्वे मंत्री लाल बहादूर शास्त्री यांनी बांधले होते. मात्र हे स्थानक 2016 मध्ये बंद करण्यात आले. भारतीय रेल्वेने काही नियम ठरवून दिले आहेत, जर कोणत्याही स्थानकाने त्या नियमांचे पालन केले नाही तर ते स्थानक बंद करण्याचा अधिकार रेल्वेला आहे.
त्यातील एक नियम असा आहे की मेन लाइनवर एखादे स्थानक असल्यास तेथे दररोज किमान 50 तिकिटे काढली जावीत. त्यामुळे जर स्टेशन ब्रँच लाईनवर असेल तर तिथे दररोज किमान २५ तिकिटे विकली जावीत. भारतीय रेल्वेने घालून दिलेल्या या नियमाची पूर्तता न केल्यामुळे दयालपूर स्थानक बंद करण्यात आले. मात्र यामुळे येथील अल्पसंख्या असलेल्या परंतु गरजू प्रवाशांची कोंडी झाली. स्टेशन पुन्हा सुरू करण्यासाठी आजूबाजूच्या गावातील रहिवाशांनी अनेकवेळा अर्ज केले होते.