नाशकातून दोन मुलींचे अपहरण

Last Updated on November 25, 2022 by Jyoti S.

नाशिक : शहरातून पुन्हा दोन मुली बेपत्ता झाल्या असून, त्यांचे कुणी तरी अपहरण केल्याचा संशय कुटुंबीयांनी वर्तविला आहे. त्यात एका बाहेरगावच्या शाळकरी मुलीचा समावेश असून, या प्रकरणी पंचवटी आणि भद्रकाली पोलीस ठाण्यात नोद करण्यात आली आहे.

शहरातील शाळेत शिक्षण घेणारी अल्पवयीन मुलगी मंगळवार (दि. 22) पासून बेपत्ता आहे. शाळा सुटल्यानंतर ती बसमधून आपल्या मैत्रिणीसमवेत घरी असताना, निमाणी भागात अन्य मैत्रिणीला भेटून येते, असे सांगून ती बसमधून उतरली ती अद्याप घरी परतली नाही. कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेऊनही ती न मिळाल्याने तिला कुणी तरी पळवून नेल्याचा संशय व्यक्त केला आहे. याप्रकरणी पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक निरीक्षक पाटील तपास करीत आहेत.

दुसरी घटना जुने नाशिक भागात घडली. अल्पवयीन मुलगी बुधवारी (दि. 23) घरात कुणास काही एक न सांगता निघून गेली आहे. तिला कुणी तरी फूस लावून पळवून नेल्याचा संशय कुटुंबीयांनी वर्तविला असून, याप्रकरणी. भद्रकाली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी उपनिरीक्षक माळी तपास करीत आहेत. हेही वाचा: आफ्रिकेच्या आठ विद्यार्थ्यांना नाशकात घातला गंडा !