Last Updated on January 8, 2023 by Taluka Post
Latur Crime: तीन दिवसांच्या बाळाचा आईनेच घोटला गळा
लातूर: प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूती झालेल्या २५ वर्षीय आईनेच आपल्या तीन दिवसांच्या मुलीचा गळा दाबून खून केल्याचा धक्कादायक प्रकार लातूर तालुक्यात घडला. याबाबत गातेगाव पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आईला अटक केली आहे.
तीन दिवसांच्या बाळाचा आईनेच घोटला गळा
?आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?
उस्मानाबाद जिल्ह्यातील होळी (ता. लोहारा) येथील रेखा किसन चव्हाण ही महिला दुसऱ्यांदा गरोदर राहिली होती. तिला पहिली मुलगी असून, ती महिला २७ डिसेंबर रोजी प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी दाखल झाली होती.
नकोशी म्हणून केला खून….
पहिली मुलगी झाल्यानंतर चव्हाण(Chavan) दाम्पत्याने पुन्हा मुलासाठी प्रयत्न केला होता. मात्र, दुसयावेळीही मुलगीच झाली. मुलगी नको असल्याने मातेनेच प्राथमिक आरोग्य केंद्रात २९ डिसेंबर रोजी तीन दिवसांनंतर रुमालाने बाळाचा गळा दाबून खून केल्याचे तपासामध्ये समोर आले आहे, असे पोलिस उपनिरीक्षक किशोर कांबळे यांनी सांगितले.
हेही वाचा: Cigarette fines nashik: गाडी चालविताना सिगारेट ओढाल तर दीड हजाराचा दंड