​Mira Road Murder Case : मुंबई मधील हृदय पिळवटनारा हत्याकांड ! प्रियसीचे 1000 तुकडे करून ते कुकर मध्ये शिजवून कुत्र्यांना खाऊ घातले सविस्तर बातमी पहा

Last Updated on June 10, 2023 by Jyoti Shinde

​Mira Road Murder Case

Mira Road Mumbai Murder Case: मुंबईतील मीरा रोड येथील एक धक्कादायक घटना समोर आलेली असून या घटनेने पूर्ण मुंबई शहर हादरले आहे. 56 वर्षीय वृद्धाने आपल्या लिव्ह-इन पार्टनरची निर्घृण हत्या केली आणि ते लपवण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्याच्या एका चुकीमुळे ही घटना उघड झाली.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

मीरारोड येथील भीषण हत्याकांड

दिल्लीतील श्रद्धा वॉकर हत्याकांडानंतर आता मुंबईत एकच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबईतील मीरारोड परिसरातील आकाश गंगा सोसायटीत एका महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली. एवढेच नाही तर हत्येचा पुरावा पुसण्यासाठी आरोपीने महिलेच्या मृतदेहाचे तुकडे कुकरमध्ये उकळून नंतर मिक्सरमध्ये टाकले. त्याने काही तुकडे कुत्र्यांनाही खाऊ घातले.Mira Road Murder Case

प्रथम गळा दाबला, नंतर तुकडे

पुरावे नष्ट करण्यासाठी त्याने घृणास्पद कृत्य केले. पोलिसांनी घटनास्थळावरून महिलेच्या मृतदेहाचे अवयव जप्त केलेले आहेत. आरोपी मनोज साने (manoj sane) वय 56 हा लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये त्या पोरीसोबत राहत होता. आधी त्याने महिलेचा गळा दाबून खून केला, नंतर मृतदेहाचे तुकडे केले.

33 वर्षीय महिलेचा मृत्यू

मृत महिलेची ओळख पटली असून ती 32 वर्षाची होती आणि तिचे नाव सरस्वती वैद्य असे होते . पोलिसांनी सांगितले की, सरस्वती वैद्य या ५६ वर्षीय मनोज साने यांच्यासोबत मीरा रोडवरील आकाशगंगा सोसायटीत गेल्या तीन वर्षांपासून भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होत्या. मात्र आरोपीच्या एका चुकीमुळे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले.​Mira Road Murder Case

हेही वाचा: Crime news : नागरिकांनो सतर्क राहा,दुधात होतेय जोरदार भेसळ पोलिसांना खबर देऊन भांडाफोड व्हिडीओ पहा

आरोपीची एक चूक…

इमारतीत राहणाऱ्या अनेकांना अनेक दिवसांपासून दुर्गंधी येत होती. लोकांनी याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी इमारतीच्या सातव्या मजल्यावरून महिलेचा कुजलेला मृतदेह बाहेर काढला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेची हत्या केल्यानंतर मृतदेहाचे तुकडे करण्यात आले.Mira Road Murder Case

दुर्गंधीमुळे इमारतीतील रहिवासी हैराण

मृतदेहाचे तुकडे केल्यानंतर आरोपींनी ते तुकडे कुकरमध्ये शिजवून दुर्गंधी पसरू नये म्हणून उकळले. त्यानंतरही शेजाऱ्यांना विचित्र वास येत होता. दुर्गंधीमुळे इमारतीत राहणारे सर्वजण हैराण झाले होते. यानंतर बिल्डिंग मधील लोकांनी पोलिसांत लगेच आपली तक्रार दाखल केली.

704 मध्ये छापा टाकला असता पोलीसही अचंबित झाले

गुप्त माहिती मिळाल्यावर पोलिसांनी सातव्या मजल्यावरील फ्लॅट 704 वर छापा टाकला. दरवाजा उघडताच त्यातून दुर्गंधी येत होती. मृतदेहाचे अनेक तुकडे होते, जे त्यांनी लगेच ताब्यात घेतले. तसेच, फॉरेन्सिक टीमला घटनास्थळी पाचारण करण्यात आले असून फ्लॅटमधून अनेक पुरावे जप्त करण्यात आले आहेत. शवविच्छेदन अहवालानंतर अधिक माहिती समोर येईल. सध्या हे दोघे राहत असलेल्या फ्लॅटला पोलिसांनी सील ठोकले आहे.​Mira Road Murder Case

रागाच्या भरात कृत्य

मिळालेल्या माहितीनुसार, मनोज आणि सरस्वती यांच्यात काही कारणावरून वाद झाला होता. रागाच्या भरात त्याने तिची हत्या केल्याची कबुली दिली. दोघांमध्ये वाद झाल्यानंतर मनोजने सरस्वतीची हत्या केली आणि नंतर बाजारातून करवत आणून मृतदेहाचे तुकडे केले. दुर्गंधी थांबवण्यासाठी त्यांनी कुकरचा वापर केला. पण वास अजूनही होता. विचित्र वासामुळे चिंतित झालेल्या नागरिकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आणि धक्कादायक प्रकार समोर आला.Mira Road Murder Case

हेही वाचा: Sinner Crime news : आरोपीच्या घरासमोरच रचली मृतांची चिता; नाशिकमध्ये खळबळ