Nanded News : तरुणांनी गाडीत गाय समजून गाडी थांबवली, अन लगेच गो तस्करांनी गोरक्षकाची हत्या केली.कारण पहा

Last Updated on June 20, 2023 by Jyoti Shinde

Nanded News

नाशिक : ही घटना नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील इस्लापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडली आहे . गो तस्करांनी केलेल्या हल्ल्यात एका गोरक्षकाचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

तिथे काही तरुण हे गोरक्षणाचे काम करत असतात. कारण त्यांना गाय वाचवायची आहे. गुरे वाचवली तर माती वाचेल. माती सोडली तर देशाला चांगले धान्य मिळेल. ही त्यामागची संकल्पना आहे. त्यामुळे गायींची कत्तल होणार असेल तर हे युवक ते थांबवतात. गुरांना कत्तलीपासून वाचवते.गो तस्करांनी केलेल्या हल्ल्यात एका गोरक्षकाचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. काल रात्री 11.30 च्या सुमारास मलकाजाम गावाजवळ ही घटना घडली. या घटनेनंतर आता संपूर्ण परिसरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झालेले आहे.Nanded News

बोलेरो गाडी पुलावर थांबली

किनवट तालुक्यातील शिवणी आणि चिखली गावातील सात गोरक्षक एका कार्यक्रमासाठी तेलंगणा राज्यात गेले होते. परतत असताना आप्पारोपेठजवळ त्यांना पांढऱ्या रंगाची पिकअप बोलेरो दिसली. त्यात गुरे असल्याचा संशय तरुणांना आला. त्यांनी त्या गाडीचा पाठलाग सुरू केला. त्यानंतर त्यांनी मलकाजाम पुलावर बेलोरो गाडी थांबवली.

हेही वाचा: Nashik Ropeway Project Maharashtra : नाशिक शहरालगतच्या या ठिकाणी होणार रोपवे; केंद्र सरकारने महाराष्ट्रातील या 4 ठिकाणांची केली निवड

एक ठार, सहा जखमी

शेखर रापेल्ली आणि महेश कोंडालर गाडी तपासण्यासाठी खाली उतरले. त्यानंतर अचानक बोलेरो कारमधील चौघांनी हल्ला केला. नंतर सहा ते आठ जण दुचाकीवरूनही आले. सर्वांनी लाठ्या, दगड आणि चाकूने हल्ला केला. यामध्ये शेखर रापल्ली या युवकाचा मृत्यू झाला. यात चार जण गंभीर जखमी झाले, तर दोन जण किरकोळ जखमी झाले. चार जखमींना उपचारासाठी नांदेडला पाठवण्यात आलेले आहे.Nanded News

चार आरोपींची ओळख पटली

हे सर्व तरुण गोरक्षक म्हणून काम करायचे. सर्वजण विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आहेत. या प्रकरणी जखमी युवक संतोष पेंटेवार यांच्या फिर्यादीवरून इस्लापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. चारही आरोपींची ओळख पटली असल्याचे पोलिसांनी सांगितले. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.

शिवणी, चिखलीत तणाव स्थिती

या घटनेनंतर इस्लापूर, शिवणी, चिखली गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे नांदेड पोलिसांसह केंद्रीय राखीव पोलिस दल आणि शीघ्र कृती दलाची पथके तैनात करण्यात आली होती.या दरम्यान, आरोपींना अटक होईपर्यंत तो मृतदेह आम्ही ताब्यात घेणार नाही, असे सांगण्यात आले आहे . या परिस्थितीमुळे शिवणीत ग्रामस्थ आणि हिंदुत्ववादी संघटनांनी रास्ता रोको केला आहे.Nanded News

हेही वाचा : map of nashik district : महाराष्ट्र राज्यात आता नवीन 22 जिल्ह्यांची निर्मिती होणार, तुम्ही कोणत्या जिल्यात जाताय ते पहा