Last Updated on December 16, 2022 by Jyoti S.
Nandgaon: गौण खनिज विभागाची कारवाई, सहा महिने उत्खनन
नंदगावमधील गनेश नगर भागातील अवैध खडीक्रशरवर जिल्हा । गौण खनिज विभागाच्या पथकाने कारवाई करीत ते सील केले. सहा महिन्यांपासून अवैधपणे चालविण्यात येणाऱ्या खडीक्रशरवर नाशिकच्या पथकाने कारवाई केल्याने स्थानिक प्रशासनाच्या भूमिकेवर संशयाची सुई फिरली आहे.
गणेशनगर(Nandgaon) भागात गट क्रमांक १/१७ येथे अवैधपणे क्रशर सुरू त्याची तक्रार जिल्हाधिकारी जाऊन कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार पथकाने बुधवारी (दि. १४) या ठिकाणी भेट दिली असता, क्रशरचालकाकडे उत्खननाची कोणत्याही प्रकारची कागदपत्रे आढळली नाहीत.
हेही वाचा: PM Kisan Update: शेतकऱ्यांसाठी खुशखबर, या दिवशी मिळणार 13 वा हप्ता.
गेल्या दोन महिन्यांपासून सारूळ येथील अवैध क्रशरचा मुद्दा जिल्हाभर गाजत आहे. या प्रकरणी प्रशासनाने मौन धारण केले असताना, गणेशनगरच्य खडीक्रशर चालकाकडे उत्खननासंदर्भातील कोणतीही परवानगी नाही. मालेगावच्या अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या समक्ष क्रशर सील केले असून, किती उत्खनन झाले याची माहिती गोळा करायचे काम सुरू आहे. अहवालानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल.