Last Updated on December 27, 2022 by Jyoti S.
Nashik Police:पोलिसांचा इशारा न जुमानता पळ काढाल तर दीड हजाराचा दंड
Nashik Police उल्लंघन भोवले : १ लाख १८ हजार बेशिस्त नाशिककरांना दंड
Nashik Police: नाशिक शहर व परिसरात वाहतुकीचा बोजवारा उडत असल्याने वाहतूक कार्याध्यक्ष म्हणून नितीन लभडे शाखेने कारवाईवर भर देत चौकाचौकांत तपासणी सत्र सुरू केले आहे; मात्र तरीही बेशिस्त वाहनचालक अद्यापही स्वयंशिस्त’ न बाळगता वाहतूक नियमांचे सर्रासपणे उल्लंघन करताना दिसून येत आहेत. वाहतूक पोलिसांच्या इशाऱ्यांना न जुमानता काही वाहनचालक दुचाकी दामटविताना दिसून येतात.
नाशिक शहरातील रस्ते वाहतूक व अंतर्गत रस्त्यांवरील अपघातांचे प्रमाण बघता वाहतुकीला शिस्त लावणे गरजेचे आहे. शहरातील प्रमुख चौकांमध्ये व अंतर्गत रस्त्यांवर वाहतूक नियम वाहनांच्या चाकांखाली तुडविले जात असल्याचे चित्र पाहावयास मिळते. कोणी सिग्नलचे उल्लंघन जमेल तितके प्रवासी घेऊन धावताना करतो तर कोणी दुचाकीने तीन नव्हे तर
दिसतो. विरुद्ध बाजूने वाहने चालविणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस आहेत. वाढत आहे आणि मोबाइलवर बोलत दुचाकी, चारचाकी चालविण्याची जणू फॅशनच झाली आहे. यामुळे शहरात दिसतो. विरुद्ध बाजूने वाहने चालविणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस आहेत. वाढत आहे आणि मोबाइलवर बोलत दुचाकी, चारचाकी चालविण्याची जणू फॅशनच झाली आहे. यामुळे शहरात वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत.
यामुळे अपघातांच्या प्रमाणातही वाढ होऊ लागली आहे. कुठलाही नियम मोडल्यास किमान ५०० रुपयांचा दंड भरावा लागतो. कारण केंद्रीय मोटार वाहतूक कायद्यांतर्गत दंडाची तरतूद वाढली आहे. यामुळे वाहतूक नियमांचे पालन करणे प्रत्येकाला गरजेचे आहे.
जानेवारीपासून ऑक्टोबर अखेरपर्यंत शहर वाहतूक शाखेने हेल्मेट, ट्रिपल सीट, विरुद्ध बाजूने वाहन चालविणे, सिग्नल जम्पिंग, सीट बेल्ट टाळणे, मोबाइल वापर, न- पार्किंग, काळी काच व अन्य वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सुमारे १ लाख १७ हजार ९३३ बेशिस्त लोकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. एकूण १ कोटी २८ लाख ५७ हजार ३५० रुपयांचा दंड ठोठावला गेला आहे.
हेही वाचा: Nashik sagar sweet: सागर स्वीटच्या ३५ लाखांवर कामगारानेच मारला डल्ला!
सर्वाधिक कारवाई हेल्मेट न वापरणाऱ्यांवर!
शहर वाहतूक शाखेने हेल्मेट न वापरता दुचाकी चालविणाऱ्यांवर आतापर्यंत सर्वाधिक कारवाई केल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. हेल्मेटसक्तीची मोहीम डिसेंबरच्या सुरुवातीपासून अद्यापही शहरात राबविली जात आहे.
■ ऑक्टोबरअखेरपर्यंत शहरात ३४ हजारांपेक्षा जास्त विनाहेल्मेट दुचाकी चालविणायांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांना सुमारे दीड कोटीचा दंड ठोठावला आहे.