Last Updated on December 27, 2022 by Jyoti S.
Nashik sagar sweet: दोघांकडून हातसफाई एकास अटक; २७ लाख हस्तगत
Nashik sagar sweet: गंगापूर रोडवरील सागर स्वीट दुकानाच्या वरच्या मजल्यावरील कार्यालयाचा दरवाजा तोडून आतमधील ड्रॉवरमधून दोघा चोरट्यांनी ३५ लाखांची रोकड गायब केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. काही महिने काम केल्यानंतर नोकरी सोडून गेलेल्या परप्रांतीय कामगाराने एका साथीदाराला हाताशी धरून ही घरफोडी केल्याचे गुन्हे शाखा युनिट एक व गंगापूर पोलिसांच्या पथकाने उघडकीस आणले आहे. संशयिताकडून चोरी केलेले २२ लाख ७० हजारांची रोकड हस्तगत केली आहे.
सागर स्वीट्सच्या(Nashik sagar sweet) दुकानात काही महिन्यांपूर्वी संशयित विवेककुमार उर्फ अंजनी रामेश्वरप्रसाद हा नोकरी करत गेल्या होता. त्याने काही महिन्यांपूर्वी येथील नोकरी सोडून त्याचे मूळ गाव उत्तर प्रदेश गाठले होते. दुकानाच्या वरील बाजूस कार्यालय असून त्याठिकाणी ड्रॉवरमध्ये रोकड ठेवलेली असते, हे केवळ माहितीगारालाच ठाऊक असल्याचा अंदाज बांधत गंगापूर पोलिस ठाण्याचे पथक व गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ यांनी तपासाला गती दिली. येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले; मात्र त्यात काही फारसे स्पष्ट झाले नाही. यानंतर ढमाळ यांनी नाशिकरोड रेल्वेस्थानक गाठले. तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली असता संशयितांचे फुटेज काही प्रमाणात स्पष्ट झाले.
यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची परवानगी घेत सहायक निरिक्षक सुर्यवंशी, योगेश चव्हाण, सहायक उपनिरिक्षक रविंद्र बागुल, येवाजी महाले, संदीप भांड, विशाल देकबुली दिली. त्याचा साथीदार व मुख्य सुत्रधार विवेककुमार यास लवकरच न्यायालयाच्या आदेशाने तेथील पोलिसांकडून(Nahsik sagar sweet) ताब्यात घेण्यात येणार असल्याची माहिती पोलिस उपआयुक्त प्रशांत बच्छाव यांनी सोमवारी (दि.२६) आयुक्तालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.वरे, यांचे पथक उत्तरप्रदेशकडे रवाना झाले. तेथे त्यांनी आठवडाभर परिश्रम घेत संशयित अखिलेशकुमार मनिराम (२५) यास उत्तरप्रदेशमधील बाराबंकी जिल्ह्यात जाऊन सापळा रचून बेड्या ठोकल्या. त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने विवेककुमार याच्यासोबत मिळून घरफोडी केल्याची संशयित आरोपी अखिलेशकुमार मनिराम यास ताब्यात घेतल्यानंतर मुद्देमाल दाखविताना उपआयुक्त प्रशांत बच्छाव, वसंत मोरे, समवेत विजय ढमाळ, रियाज शेख आदी.हेही वाचा: Panchavati nashik market : बळीराजाने जनावरांसाठी शेतात सोडला टमाटा !
प्रथमदर्शनी १५ लाख झाले होते गायब!
सागर स्वीट नावाचे दुकान आहे. या दुकानाचे मालक रतन पुनाजी चौधरी (४०, रा. लवाटेनगर) यांनी गंगापूर पोलिस ठाण्यात कार्यालय फोडून १५ लाखांची रोकड गायब केल्याची फिर्याद दिली होती. या फिर्यादीनुसार रविवारी (दि. १८) मध्यरात्री चोरट्याने दुकानाच्या वरील बाल्कनीतून आतमध्ये येत कार्यालयाच्या दरवाजाचे लॅच लॉक तोडून टेबलच्या ड्रॉव्हरमध्ये ठेवलेली १५ लाखांची रोकड चोरून नेल्याचे समोर आले होते. यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला असता अजून २० लाखांची रोकडदेखील चोरी झाल्याची खात्री संबंधितांना पटली.
स्वतःला अटक करून घेण्याची शक्कल!
दुकानातील कामगार असलेला संशयित विवेककुमार याने घरफोडीचा कट रचला. त्याने मणिरामला सोबत घेत ३५ लाखांची रोकड लुटली. यानंतर २० डिसेंबर रोजी त्याने उत्तर प्रदेशमधील सफदरगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत स्वतःला पोलिसांच्या हवाली केले. यासाठी त्याने पोलिसांना फोन करून बोलावून घेत स्वतःकडे हत्यार बाळगल्याचा बनाव केला. नाशिक पोलिसांची अटक टाळून घरफोडीच्या गुन्ह्यात त्याचा सहभाग नव्हता असे त्याला भासवायचे होते. त्यामुळे त्याने ही शक्कल लढविल्याचे पोलिसांनी सांगितले.