Last Updated on December 30, 2022 by Jyoti S.
Rhea Kumari: अभिनेत्रीला मारण्यासाठी पतीने रचला होता कट
हावडा : झारखंडमधील अभिनेत्री रिया कुमारी(Rhea Kumari) उर्फ ईशा आलिया यांची पश्चिम बंगालमधील महामार्गावर लूटमार करणाऱ्यांनी हत्या केल्याचे पती प्रकाशकुमार अलबेलाने सांगितले होते, परंतु त्यानेच हा बनाव रचून हत्या केल्याचे रहस्य पोलिसांनी २४ तासांतच उलगडले. प्रकाशला याप्रकरणी अटक केली.
रिया झोपेत असतानाच जवळून प्रकाशने गोळ्या झाडल्या(Rhea Kumari) असा दावा पोलिसांनी केला. या खून प्रकरणात पहिल्या पत्नीचे नावही समोर येत आहे. दोघांनी मिळून हत्येचा कट रचल्याची चर्चा आहे. प्रकाश दिग्दर्शक असून, त्याने रियाबरोबर प्रेमविवाह केलेला असला तरी हे त्याचे दुसरे लग्न होते.
हेही वाचा: Nashik sagar sweet: सागर स्वीटच्या ३५ लाखांवर कामगारानेच मारला डल्ला!
त्यामुळेच तो सुरुवातीला लग्नास तयार नव्हता. प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर त्याने लग्न केले. दोघांनाही एक मुलगी आहे. प्रकाशला पहिल्या पत्नीपासून दोन मुलेही आहेत. दोघांत सुरुवातीपासूनच वाद असल्याने त्याला रियापासून(Rhea Kumari) सुटका हवी होती. त्यातूनच त्याने एखाद्या चित्रपटात शोभेल असा तिच्या हत्येचा कट रचला .