Sale of fake clothes : ब्रँडेडच्या नावाने बनावट कपड्यांची विक्री, ह्या दुकानदारावर कॉपीराइट कायद्यान्वये गुन्हा दाखल

Last Updated on June 22, 2023 by Jyoti Shinde

Sale of fake clothes

ब्रँडेड कंपन्यांचे बनावट मोबाइल साहित्य विकणाऱ्या दोन विक्रेत्यांवर कारवाई झाल्याची घटना ताजी असतानाच आता ब्रँडेड कंपन्यांच्या नावाने बनावट कपडे विकणाऱ्या दुकानमालकावर कारवाई करण्यात आली आहे. हुंडीवाला लेन येथील एका दुकानात कंपनीच्या नावाचा वापर करून ब्रँडेडच्या नावाने बनावट कपड्यांचा साठा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

विक्रेत्याकडून 14,000 रुपयांचा माल जप्त केल्यानंतर, भद्रकाली पोलिस ठाण्यात व्यापारी किशोर खिलदास लालवाणी (शेष होलाराम कॉलनी) यांच्याविरुद्ध प्रकाशन हक्क (कॉपीराइट) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Sale of fake clothes

राकेश राम सावंत यांनी भद्रकाली पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सावंत हे एका कापड कंपनीत फिल्ड ऑफिसर असून ते बनावट कपडे विकणाऱ्यांवर कारवाई करतात. त्यानुसार नाशिक येथील कानडे मारुती लेन येथील एका दुकानात कंपनीच्या नावाने बनावट कपडे विकले जात असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार सावंत यांनी गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव व उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांना महादेव होजियरीच्या दुकानात कपड्यांची तपासणी करून माहिती दिली.

हेही वाचा: Weird Beer : कुणी माणसाचं मूत्र, कुणी हत्तीचं शेण, कुणी तिखट, कुणी सांडपाणी; या विचित्र पद्धतीने बनते बिअर, वाचा…

त्यानुसार भद्रकाली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दिलीप ठाकूर यांनी सावंत यांच्यासह एक पथक दुकानात पाठवले. तेथे पथकाने पाहणी करून साहित्य जप्त केले. यामध्ये स्पोर्ट्स पँट 4,800 रुपये, नाइट पॅन्ट 3,600 रुपये आणि इतर रंगांची नाइट पॅंट 5,625 रुपये आहे. काही कपडे चाचणीसाठी कंपनीला देण्यात आले आहेत. याप्रकरणी अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक दीपक पटारे करीत आहेत.Sale of fake clothes

बनावट वस्तूंमुळे ग्राहकांची फसवणूक

याआधीही शहरात बनावट मालाची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. सरकारवाडा पोलिसांनी एप्रिल महिन्यात प्रधान पार्कमधील दोन विक्रेत्यांवर कारवाई करून त्यांच्याकडून 2 लाख 88 हजार रुपयांचा बनावट माल जप्त केला होता. यामध्ये ग्राहकांची आर्थिक फसवणूक होत असल्याचे समोर आले.Sale of fake clothes

हेही वाचा: Diabetic Patient : तुम्हालाही सतत डोकेदुखी असते का? यामागे ‘ही’ कारणे असू शकतात, चुकूनही दुर्लक्ष करू नका