Sinner-shirdi : मृत गोवंशच्या अवशेषांची वाहतूक

Last Updated on December 19, 2022 by Jyoti S.

Sinner-shirdi : वावी येथील बजरंग दलाने ट्रक दिला पोलिसांच्या ताब्यात

सिन्नर-शिर्डी महामार्गावर मृत गोवंश अवशेषांनी भरलेला ट्रक रविवारी (दि. १८) वावी येथील बजरंग दल व पांगरी येथील सुनबाई गोशाळेच्या कार्यकर्त्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

सिन्नर-शिर्डी (sinner-shirdi)महामार्गावर वावी गावाजवळ एका ट्रकचा वास येऊ लागल्याने येथील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सदर ट्रकला थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र ट्रकचालक भरधाव वेगाने ट्रक पळवू लागला. त्यामुळे अधिक संशय बळावल्याने कार्यकर्त्यांनी तत्काळ गाडीचा पाठलाग करून ती थांबवून गाडी पोलिस ठाण्यात आणली. यावेळी या गाडीतील वाहन चालक जावेद समीर पठाण (२४) व साहिल युनीस सय्यद (१९), सादिक युनिस सय्यद (१७), साहिल पासू सय्यद (१४), समीर पासु अय्यद (१७), शाहरुख यूनिस सय्यद (२१) आदींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा : Sinner solar power :सिन्नरच्या १७ गावांत उभारणार सौरऊर्जा प्रकल्प

((sinner-shirdi))वावी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सागर कोते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार दशरथ मोरे पुढील तपास करत आहेत. सदर गोवंश अवशेष मुंबईहून औरंगाबादकडे जात असल्याची माहिती समोर येत आहे.

Comments are closed.