चीनमधील आयफोन कंपनीत हजारो कर्मचाऱ्यांची तीव्र निदर्शने

Last Updated on November 24, 2022 by Jyoti S.

पोलिसांची आंदोलकांना मारहाण, अनेक जण ताब्यात; वेतन रोखणे व कंत्राटावरून कामगारांत असंतोष


बीजिंग : चीनमध्ये असलेल्या पांगविले, जगातील सर्वात मोठ्या अॅपल आयफोन कंपनीतील श्रमिकांनी बुधवारी तीव्र निदर्शने केली. कोरोना महामारीने नव्याने डोके वर काढल्यामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनदरम्यान वेतन रोखणे, आर्थिक फसवणूक करणे व कंत्राट वादाच्या मुद्द्यावरून कामगारांमधील असंतोष उफाळून आला आहे. यावेळी पोलिसांनी बळाचा वापर केला व आंदोलकांना मारहाण करीत त्यांना पांगविले, तर उग्र निदर्शने करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले आहे.

चीनमधील झोंगझोऊस्थित आयफोन कंपनीत मास्क लावलेल्या हजारो कर्मचाऱ्यांनी जोरदार निदर्शने केली. कोरोना काळात नियमित वेतन दिले नसल्याने कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत. निदर्शने करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झालेत. यात तैनात पोलीस अधिकारी आंदोलकांचा सामना करताना दिसून आले. एका आंदोलकाच्या डोक्यावर लाठीहल्ला करणे व त्याचे हात बांधून नेतानाची दृश्ये व्हिडीओत दिसत आहेत. कंपनीविरोधात आवाज बुलंद करणारे कर्मचारी आपल्या कामाच्या ठिकाणीच मुक्कामी होते. त्यांचा बाहेरच्या जगाशी काहीही संबंध नव्हता; परंतु गेल्या महिन्यात चीनमध्ये कोरोनाचा नव्याने उद्रेक झाला. यावेळी कंपनीने पुरेशा प्रमाणावर उपाययोजना केल्या नाहीत. परिणामी, कर्मचारी आजारी पडू लागले. अशा तक्रारींना वैतागून काही कर्मचाऱ्यांनी कंपनी सोडली होती, असे आयफोन कंपनीच्या ‘फॉक्सकॉन टेक्नोलॉजी ग्रुप’च्या संचालकांनी म्हटले

चीन सरकारने कंपनीच्या चहूबाजूने आणि औद्योगिक परिसरात निर्बंध लादले. आयफोन कारखान्यात तब्बल 2 लाखांहून अधिक कर्मचारी सेवारत होते. ‘फॉक्सकॉन कर्मच टेक्नॉलॉजी ग्रुप’च्या तैवानची राजधानी तैपेईस्थित मुख्यालयाने ही निदर्शने करण्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. चीनमध्ये गेल्या तीन आठवड्यांत तब्बल 2 लाख 53 हजारो हजार नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. आहे. विशेष बाब अशी की, झोंगझोऊ कंपनीवर निर्बंध लादल्यामुळे आयफोन 14 मॉडेल बाजारात येण्यास विलंब लागणार असल्याचे अॅपल इंकने स्पष्ट केले होते. हेही वाचा : जगात दर ११ मिनिटाला जवळच्या व्यक्तीकडून एका महिलेची हत्या