Monday, February 26

Tunisha Sharma suicide : अभिनेत्री तुनिशा शर्माची आत्महत्या

Last Updated on December 24, 2022 by Jyoti S.

Tunisha Sharma suicide: अभिनेत्री तुनिशा शर्माची आत्महत्या ?आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने आत्महत्या केली आहे. तिने मालिकेच्या सेटवर(On the sets of the series) गळफास लावून जीवन संपवल्याचं कळतंय. तिच्या आत्महत्येचं(suicide) कारण अद्याप समोर आलेलं नाही. तुनिषा २० वर्षांची(20) होती आणि आतापर्यंत तिने अनेक मालिकांमध्ये काम केलंय. तिने तिच्या करिअरची सुरुवात इंडस्ट्रीमध्ये( industry) बालकलाकार म्हणून केली होती. तुनिषा सोनी सब (SONY SAB)टीव्हीवरील मालिका ‘अलिबाबा: दास्तान ए काबुल’ मध्ये मुख्य भूमिका साकारत होती.

तुनीषा शर्माने(Tunisha Sharma) शनिवारी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली. वसई(Vasai) पूर्वेच्या कामण येथील एका स्टुडिओमधील प्रसाधनगृहात तिने गळफास लावला. या प्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा(crime) दाखल करण्यात आला आहे. नाताळच्या(christmas) पूर्वसंध्येला ही घटना घडल्याने सिनेक्षेत्रात खळबळ उडाली आहे. तुनिषाने आत्महत्या केल्यानंतर सेटवरील लोकांनी तिला रुग्णालयात (Hospital)नेलं होतं. पण रस्त्यातच तिचं निधन (passed away)झालं.

तुनिषा शर्माचा परिचय

14 जानेवारी 2002ला चंदीगढमध्ये जन्म

‘भारत का वीर पुत्र महाराणा प्रताप’ मालिकेतून अभिनयात पदार्पण

अनेक हिंदी मालिकांमध्ये काम

सोनी सब टीव्हीवरील ‘अलीबाबा : दास्तान ए काबुल’ मालिकेत प्रमुख भूमिका

चक्रवर्ती अशोक सम्राट, गब्बर पूंछवाला मालिकेत अभिनय

विद्या बालनच्या कहानी-2 चित्रपटातही अभिनय

अवघ्या विसाव्या वर्षी संपवलं जीवन

हेही वाचा: Manja: नायलॉन मांजा खरेदी-विक्री करणाऱ्यांना मोक्का लावा,अंबादास खैरे!!