आधारची फसवणूक टाळण्यासाठी पडताळणी करा!

Last Updated on November 28, 2022 by Taluka Post

यूआयडीएआयच्या राज्य सरकारांना सूचना

मुंबई 18 देशभरात सध्या डिजिटल व्यवहारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्याचबरोबर सायबर धोकेदेखील वाढू लागले आहेत. आधारद्वारे आर्थिक फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस अधिक वाढत असल्याचे समोर आले आहे. या पाश्र्श्वभूमीवर भारतीय युनिक आयडेंटिफिकेशन अॅथॉरिटी (यूआयडीएआय) ने एखाद्या व्यक्तीची ओळख म्हणून त्याचे आधार कार्ड भौतिक किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपात स्वीकारण्यापूर्वी त्याची पडताळणी करावी, असे आदेश राज्य सरकारांना दिले आहेत..

घोटाळे, फसवणूक रोखण्यासाठी आणि त्यांचा सामना करण्यासाठी यूआयडीएआयने राज्य सरकाना सूचना केली आहे. जेव्हा आधार ओळखीचा पुरावा म्हणून किंवा ओळख दस्तऐवज म्हणून आधार वापरला जातो, तेव्हा संबंधित संस्थेच्या रहिवाशाची पडताळणी करण्यास सांगितले आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने दिलेल्या निर्देशात म्हटले की, कोणतेही आधार कार्ड पीव्हीसी कार्ड आणि एमआधार ) क्यूआर कोड वापरून सत्यापित केले जाऊ शकणार आहे. अँड्राईड आणि आयओएस आधारित मोबाईल फोनसह विंडोज अप्लिकेशनसाठी क्यूआर कोड स्कॅनर देखील उपलब्ध आहे. यूआयडीएआयच्या ट्विटनुसार, संभाव्य फसवणूक किंवा घोटाळा टाळण्यासाठी आधार स्वीकारण्यापूर्वी त्याची पडताळणी करणे आवश्यक आहे. एमआधार अॅप किंवा आधार क्यूआर कोडद्वारे आधारच्या सर्व प्रकारांवर उपलब्ध क्यूआर कोड स्कॅन करून सहजपणे पडताळणी केली जाऊ शकणार आहे.