केंद्र सरकारकडून राज्यांना जीएसटीतील नुकसानभरपाईपोटी १७ हजार कोटी वितरित

Last Updated on November 26, 2022 by Taluka Post

नवी दिल्ली केंद्र सरकारने एप्रिल ते जून २०२२ या कालावधीतील जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा करातील उर्वरित नुकसानभरपाई म्हणून राज्यांना १७,००० कोटी रुपये वितरित केले आहेत. यापैकी महाराष्ट्राला सर्वाधिक २,०८१ कोटी रुपये मिळाले. २०२१-२२ या आर्थिक वर्षात जीएसटी भरपाई म्हणून आतापर्यंत राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांना उपरोल्लेखित रकमेसह एकूण १,१५,६६२ कोटी रुपये देण्यात आले आहेत.

ऑक्टोबर २०२२ पर्यंत केवळ ७२,१४७ कोटी रुपये एकूण अधिभार संकलन झाले, ही सत्य परिस्थिती आहे आणि तरीही, केंद्र सरकारतर्फे स्वतःच्या स्त्रोतांकडून ४३,५१५ कोटी रुपये जारी करण्यात येत आहेत. यामुळे केंद्राने आगाऊ स्वरुपात या वर्षी मार्च(March) महिन्यापर्यंत संकलित करण्यात येणारी अधिभाराची अंदाजित संपूर्ण रक्कम राज्यांना भरपाई म्हणून उपलब्ध करून दिली . राज्यांना त्यांच्या स्त्रोतांचे व्यवस्थापन योग्य प्रकारे करता यावे तसेच विद्यमान आर्थिक वर्षात त्यांचे कार्यक्रम, विशेषतः भांडवलावरील व्याज यशस्वीपणे करणे सुनिश्चित व्हावे, या उद्देशाने असा निर्णय घेण्यात आला आहे. फेब्रुवारी ते मार्च २०२२ या काळासाठीची तात्पुरत्या स्वरूपातील जीएसटी भरपाई म्हणून केंद्र सरकारने या वर्षी मे महिन्यातदेखील ८६,९१२ कोटी रुपये वितरित केले होते. त्या वेळी जीएसटी नुकसानभरपाई निधीमध्ये केवळ २५,००० कोटी रुपये शिल्लक असूनदेखील स्वतःच्या स्त्रोतांमधून ६२,००० कोटी रुपयांच्या निधीची व्यवस्था करून सरकारने राज्यांना पाठबळ पुरवले होते.

बातम्या,महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत जाणून घेण्यासाठी ?आमचा WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?