
Last Updated on November 23, 2022 by Jyoti S.
71 हजार युवकांना नोकरीचे नियुक्तीपत्र
नवी दिल्ली: कोरोना महामारी आणि युक्रेन युद्धामुळे संपूर्ण जगात युवकांपुढे रोजगाराचे संकट आहे. परंतु त्याचवेळी भारतात सरकारी आणि खासगी क्षेत्रातही नव्या नोकऱ्यांच्या संधी सातत्याने वाढत आहेत, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. रोजगार मेळाव्याअंतर्गत मंगळवारी 71 हजारांहून अधिक लोकांना नियुक्तीपत्र देताना ते बोलत होते. युवकांना रोजगार देण्याची ही मोहीम अविरत सुरू राहील, असेही मोदी म्हणाले.
गुजरात आणि हिमाचल प्रदेशात विधानसभा निवडणुका असल्याने ही दोन राज्ये वगळता इतर राज्यांमधील 45 ठिकाणांवर आयोजित कार्यक्रमात 71 हजार 56 युवकांना नियुक्तीपत्र देण्यात आली. पंतप्रधान या रोजगार मेळाव्यात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी झाले. यावेळी मोदी म्हणाले की, युवकांना आता त्यांच्या गावात, शहरातच रोजगार मिळत आहे. स्टार्टअप्सपासून स्वयंरोजगार, अंतराळापासून ड्रोनपर्यंत अशा प्रत्येक क्षेत्रात या देशातील युवकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. कोरोना महामारी व युक्रेन युद्धाच्या संकटामुळे जगभरात युवकांपुढे रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचवेळी भारतात मात्र सरकारी आणि खासगी अशा दोन्ही क्षेत्रांमध्ये नोकरीच्या नवनवीन संधी निर्माण होत आहेत. गेल्या महिनाभरापासून केंद्र सरकारसोबतच भाजपशासित राज्यांमध्येही नोकऱ्या देण्यात येत असून डबल इंजिन सरकारचा फायदा असल्याचे मोदींनी सांगितले. नव भाजपने गुजरात, हिमाचलच्या प्रचारात डबल इंजिनचा मुद्दा उचलून धरला असून केंद्रात आणि राज्यात एकाच पक्षाचे सरकार असल्यास त्याचे फायदे होतात, असा सत्ताधारी पक्षाचा दावा आहे..
युवक हे देशाची सर्वात मोठी शक्ती असल्याचे मोदी म्हणाले. युवकांची प्रतिभा आणि त्यांच्या ऊर्जेचा राष्ट्रनिर्माणासाठी अधिकाधिक देण्यात उपयोग करण्याला आपल्या सरकारचे सर्वाधिक प्राधान्य आहे. प्रमाणा एण्ट्री अर्थशास्त्रज्ञांनुसार भारताला आपले आर्थिक सामर्थ्य दाखवण्याची समित्य वर्षे आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्याची सुवर्णसंधी आहे. समितीने सेवा क्षेत्रातील निर्यातीत महाशक्ती झाला आहे. आता सून उत्पादन क्षेत्रातही भारत जगाचे पॉवर हाऊस होईल, असे मोदी म्हणाले. वि र्नी हा मेक इन इंडिया, व्होकल फॉर लोकल, प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह होता. अशा विविध योजनांचा उल्लेख मोदींनी केला. नियुक्तीपत्र मिळालेल्या सर्व युवकांनी आपल्या क्षमता, कौशल्य विकसित करून नवी उंची गाठावी, व्यवहार स्टर अशा शुभेच्छा पंतप्रधानांनी दिल्या. यंदा शिक्षक, प्राध्यापक, परिचारिका, क्षेत्र नर्सिंग अधिकारी, डॉक्टर, फार्मासिस्ट, रेडिओग्राफर आणि इतर तांत्रिक लक्ष ला धन व पॅरा मेडिकलच्या पदांवर नियुक्त्या देण्यात आल्या. ऑक्टोबर महिन्यात ‘रोजगार मेळाव्या’ची सुरुवात केली होती. पहिल्या कार्यक्रमात त्यांनी 75 हजार नवनियुक्त कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र सोपवले होते. वर्षभरात १० लाख रोजगार देण्याचे आपले आश्वासन मोदींनी सर्व मंत्रालय विभागांना मंजूर रिक्त पदांवर तातडीने भरती करण्याचे निर्देश दिले आहेत. हेही वाचा : विकासाचे स्रोत वाढवण्यासाठी पावले उचलावीत