2.50 कोटींची डिअर 500 लॉटरी गुडगावच्या रिअल इस्टेट मध्यस्थाने जिंकली

Last Updated on November 24, 2022 by Jyoti S.

लुधियाना : जम्मूचे निवासी असलेले तसेच सध्या गुडगावमध्ये रिअल इस्टेट मध्यस्थीचे काम करणारे पवन कुमार यांनी नागालॅण्ड राज्याची 2.50 कोटी रुपयांची ‘डिअर 500 बाय मंथली लॉटरी’ जिंकली आहे. ही सोडत कोहिमामध्ये 19 नोव्हेंबर 2022 रोजी काढण्यात आली होती. पवन कुमार यांच्या तिकिटाचा क्रमांक ए-69986 असा आहे.

लॉटरी जिंकल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना पवन कुमार यांनी सांगितले की, मी एक मध्यमवर्गीय कुटुंबातला असल्याने मला डिअर लॉटरीचे पहिले क्रमांकाचे बक्षीस मिळाल्याचे कळताच झटका बसला. लुधियानामधील गांधी बंधूंकडून मी लॉटरीचे तिकीट घेतले होते. लॉटरी जिंकल्यामुळे मी एका क्षणात कोट्यधीश झालो असून याचा विनियोग मी चांगला व्यवसाय सुरू करण्यासाठी करणार आहे.हेही वाचा : प्राइम व्हिडिओवर वॉच पार्टी होस्ट करायची आहे त्यासाठी स्टेप बाय स्टेप गाईड