Aflatoon Box Office Collection: ‘बाईपण भारी देवा’ नंतर आता ‘अफलातून’ चा दबदबा; या चित्रपटाने दोन दिवसांत केली तुफान कमाई.

Last Updated on July 24, 2023 by Jyoti Shinde

Aflatoon Box Office Collection

Siddharth Jadhav Comedy Movie Aflatoon: अफलातून चित्रपट २१ जुलै रोजी प्रदर्शित झाला.मराठी चित्रपट बॉक्स ऑफिसवर चर्चेत राहतात. बाईपण भारी देवा हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून  सध्या बॉक्स ऑफिसवर खूपच मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. आता अफलातून कॉमेडी चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला असून हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये चांगलाच लोकप्रिय होत आहे.

या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दोन दिवसात मोठी कमाई केलेली आहे. नुकतेच या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर सुद्धा आलेले आहे.
चित्रपटाने भरपूर कमाई केली. Aflatoon Box Office Collection

हा चित्रपट शुक्रवारी 21 जुलै रोजी प्रदर्शित झाला. चित्रपटाने पहिल्या दिवशी 0.95 कोटी आणि दुसऱ्या दिवशी 2.03 कोटी कमावले. या आठवड्याच्या अखेरीस हा चित्रपट 5 कोटींचा आकडा गाठण्याची शक्यता निर्मात्यांनी व्यक्त केली आहे.

या चित्रपटाने मराठवाड्यात 29.83 लाख आणि उर्वरित महाराष्ट्रात 63.59 लाखांचा व्यवसाय केला असून मुंबईत 1.20 कोटींची कमाई केली आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूरसह अनेक शहरांतून या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

हेही वाचा: Food inflation:केवळ टोमॅटोच नाही तर खाण्यापिण्याच्या या वस्तूही महागल्या, जाणून घ्या कितीने वाढले दर

तीन उत्तम गुप्तहेर मित्रांचे नाटक चित्रपटात दाखवण्यात आले आहे. या तिघांपैकी एक आंधळा, एक मुका आणि एक बहिरा आहे. परितोष पेंटर ,सिद्धार्थ जाधव, आणि जयेश ठक्कर हे या प्रमुख भूमिकेत आहेत.

या तिघांव्यतिरिक्त चित्रपटात जॉनी लीव्हर, श्वेता गुलाटी, तेजस्विनी लोणारी, विजय पाटकर, भरत दाभोळकर, जेसी लीव्हर, विष्णू मेहरा, रेशम टिपणीस अशी स्टारकास्ट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शनही परितोष पेंटर यांनी केले आहे. Aflatoon Box Office Collection

अफलातून जॉनी लीव्हर(Johnny Lever) आणि त्याचा मुलगा जेसी लीव्हर(Jesse Lever) हे दोघं पहिल्यांदाच मराठी चित्रपटात काम करत आहेत.

हेही वाचा: Petrol Pump news:मोठी बातमी! तुम्ही पेट्रोल पंपावर 0.00 चेक करण्याच्या नादामध्ये ह्या स्कॅमकडे लक्षच देत नाही.