अंजलीने ‘असे’ कपडे घालून रस्त्यावर केला डान्स!

Last Updated on November 28, 2022 by Jyoti S.

कच्चा बदाम’ गर्ल अंजली अरोराचा एमएमएस लीक झाल्यानंतर नेहमीच चर्चेत असते. तिचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर अशा प्रकारे चर्चेत येतात की ती प्रसिद्धीच्या झोतात येते. पण आता अंजलीने सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ शेअर केला आहे की,ज्यामुळे ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली. या व्हिडीओमध्ये अंजली अरोरा रस्त्यावर डान्स करताना दिसत आहे. चाहत्यांना अंजलीचा डान्स आणि तिचा लूक अजिबात आवडला नाही, ज्यामुळे ती युजर्सच्या निशाण्यावर आली.

हा व्हिडीओ अंजली अरोराने तिच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत अंजली अरोराने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘डीजे उस्मान भट्टी… तू आ जा.‘ या व्हिडीओमध्ये अंजली अरोरा हिने काळ्या रंगाचा टॉप घातला आहे. यासोबत तिने लूज ग्रे कलरची ट्राऊजर आणि शूज घातलेले दिसले. हा पोशाख परिधान करून अंजली रस्त्यावर अशा प्रकारे नाचत आहे की, हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

https://www.instagram.com/reel/ClQMiPqJ6dx/?igshid=MDJmNzVkMjY=

अनेक चाहत्यांना अंजली अरोराचा डान्स आवडला तर काहींना आवडला नाही आणि त्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली. एका युजरने लिहिले की, ‘ती प्रत्येक गाण्यात कच्च्या बदामासारखी ‘काम करते.’ अंजली अरोरा कंगना राणावतच्या रिअॅलिटी शो ‘लॉक अप’मध्ये दिसली होती. या शोनंतरच अंजलीचा एमएमएस स्कँडल घडला, ज्याची खूप चर्चा झाली.