Last Updated on December 22, 2022 by Jyoti S.
Manja: नायलॉन मांजा खरेदी-विक्री करणाऱ्यांना मोक्का लावा
राकाँचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांची मागणी
जीवघेणा नायलॉन मांजा(Manja) विक्री व खरेदी करणाऱ्यांवर थेट मोक्कांतर्गत कारवाई करण्यात यावी, असे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी नाशिक पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांना दिले आहे.

मागील काही वर्षांपासून जीवघेण्या नायलॉन मांजाचा(Manja) वापर वाढत असून, जीवघेण्या नायलॉन मांजाच्या वापरामुळे अनेकांना आजपर्यंत आपले प्राण गमवावे लागले आहे. तर कित्येक जण जखमी झाले आहेत. न्यायालयाचा आदेश झुगारून नायलॉन मांजाची विक्री नाशिक शहरात होत आहे. नाशिक शहरात नायलॉन मांजाचा वापर वाढल्याने अनेक ठिकाणी या जीवघेण्या मांजाची सर्रास विक्री होताना पाहावयास मिळत आहे. याबाबत अनेक तक्रारी प्राप्त होत असतानादेखील प्रशासन ठोस पावले उचलताना दिसत नाही.हेही वाचा: Dog lovers: आईच्या मार खाण्यापासून कसे वाचवले पाळीव कुत्र्याने पहा:
मांजामुळे(Manja) अनेकांच्या जीवावर बेतले आहे. अती धारदार नायलॉन मांजामुळे अनेकांना गंभीर दुखापत झाल्याचे निदर्शनास येत आहे. संक्रांतीच्या काळात या नायलॉन मांजामुळे पंख व मान कापून मृत पावतात. तर दुचाकीधारकांना यामुळे अपंगत्व आलेले आहे. बाजारात नायलॉन मांजाविरोधात धाडसत्र राबविले जाते, मात्र तरीही नायलॉन मांजा विक्री सर्रास सुरू आहे. यावर तत्काळ बंदी आणून नायलॉन मांजा विक्री व खरेदी करणाऱ्यांवरसुद्धा मोक्कांतर्गत कारवाई करण्यात यावी जेणेकरून विक्री करणारा व खरेदी करणाऱ्यांवर धाक निर्माण होईल, असे निवेदनात म्हटले आहे.