Last Updated on December 18, 2022 by Jyoti S.
Snake: कोब्रा हा विषारी साप चिमुकल्यासमोर आला आणि त्यानंतर पुढे जे घडलं ते पाहून तुमच्या अंगावर खूप मोठा काटा येईल.
Snake: साप म्हटलं की भल्याभल्यांच्या अंगाला घाम फुटतो. परंतु जगात काही लोक असे आहेत, ज्यांना सापाची अजिबात भीती वाटत नाही, यात लहान मुलंही असतात .असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे . ज्यात एका लहान बाळाने सापाला धरलं आहे. खूपच विषारी आणि खतरनाक समजला जाणारा कोब्रा साप बाळासमोर फणा काढून उभा राहिला आणि त्या लहान बाळाने त्याचा फणा हातात धरला. पुढे जे घडलं ते पाहून तुमच्या अंगाला शहारे येतील.
लहान मुलांना त्यांचा समोर जी वस्तू असेल ती हातात घराण्याची सवय असते. विचार करा, त्यांच्यासमोर एखादा कोब्रा साप(Snake) आला तर काय होईल … तो साप आहे, आणि धोकादायक आहे हे त्यांना माहिती नसतं. त्यांच्यासाठी ते त्याचा खेळणंच असत . अशाच एका चिमुकल्या बाळासमोर कोब्रा आला आणि तो फणा काढून उभा राहिला. त्या सापाचा फणा पाहताच त्या चिमुकल्याने हात पुढे केला आणि त्याचा फणा हातात धरला.
आपण व्हिडीओत पाहू शकता कि हा मुलगा खूपच लहान आहे आणि त्याला नीट बोलता आणि नीट चालत सुद्धा येत नाही. त्याच्यासमोर लांबलचक खतरनाक कोब्रा(Snake) फणा काढून आहे. त्या सापाला पाहताच ते बाळ हात पुढे करत त्याला पकडण्याचा खूपच प्रयत्न करतो. त्यानंतर बऱ्याच वेळा तो त्या सापाला धरतो. तो कोब्रा त्या चिमुकल्याच्या अंगावर जातो.तसेच त्याच्या तोंडाजवळही जातो. हे सर्व पाहूनच आपल्याला धडकी भरते.हेही वाचा : Whatsapp: आता होणार नवीन वर्षात व्हॉट्स अॅपमध्ये मोठे बदल,युजर्सला मिळणार आता अनेक सुविधा…
अवघ्या 30 सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. त्या व्हिडिओच्या शेवटपर्यंत तरी त्या सापाने मुलाला काहीच दुखापत केल्याचं दिसत नाही .पण तो सापही खूपच खतरनाक दिसतो आणि त्या चिमुकल्या जीवाला अशा जीवघेण्या प्राण्यासोबत खेळताना पाहून आपल्या हृदयाची धडधड खूपच वाढते.
हा व्हिडीओ कुठला आणि कधीचा आहे माहिती नाही. हा (Snake)व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून एका युझरने त्या सापाचे दात तोडून त्याचं विष काढल आहे असं म्हटलं.