Ganesh Chaturthi 2023: तुम्हाला सार्वजनिक गणेशाची प्राणप्रतिष्ठा करायची आहे का? तर घ्या ही खबरदारी, अन्यथा…

Last Updated on September 12, 2023 by Jyoti Shinde

Ganesh Chaturthi 2023

नाशिक: काही दिवसातच गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. घरी तसेच सार्वजनिक ठिकाणी उत्सव साजरे केले जातील.

काही दिवसातच गणपती बाप्पाचे मोठ्या जल्लोषात आगमन होणार आहे. घरी तसेच सार्वजनिक ठिकाणी उत्सव साजरे केले जातील. मात्र असे सार्वजनिक सण साजरे करताना गणपती मंडळांनी काळजी घेण्याची गरज आहे. उत्सवासाठी काही परवानग्या आवश्यक आहेत.Ganesh Chaturthi 2023

यातील महत्त्वाची बाब म्हणजे मंडप उभारणी. रस्त्यावर मंडप उभारण्यापूर्वी पोलिस आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची परवानगी आवश्यक आहे. कारण दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन सतर्क आहे. मंडळाला नगरपालिका, महानगरपालिका किंवा ग्रामपंचायतीकडून ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागेल. त्यासाठी प्रामुख्याने मंडळाची नोंदणी, जागेच्या मालकाचे संमतीपत्र, घरफाळा पावती, आधार कार्ड अशी कागदपत्रे द्यावी लागणार आहेत. पालिकेने मान्यता दिल्यास पोलिस प्रशासन काही अटी घालून ना हरकत प्रमाणपत्र देते.Ganesh Chaturthi 2023

हेही वाचा: GST Council 50th Meet Decisions:जीएसटी बैठकीत काय स्वस्त आणि काय महाग? ५० व्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत निर्णय: औषधं, अन्न स्वस्त, तर गाड्या खरेदी महाग…

वाहतूक विस्कळीत होऊ नये, डीजेच्या आवाजाची मर्यादा, मंडपाचा आकार अशा काही बाबींबाबत दक्षता घेण्यात येत आहे. अर्जानंतर महापालिका प्रशासनाचे पथक अग्निशमन दलाच्या जवानांसह उत्सवस्थळाची पाहणी करते. योग्य वाटल्यास परवानगी दिली जाते. विजेसाठी वीज कंपनीकडे अर्ज करावा लागेल. महावितरण मंडळाला प्रकाशयोजनेसाठी कमी दरात वीजपुरवठा करते. अशी परवानगी न घेता सार्वजनिक ठिकाणी गणपतीची स्थापना करणे दंडनीय आहे. परवानगी मागणारे अर्ज अद्याप आले नसल्याचे महापालिकेचे प्रशासक राजेश भगत यांनी सांगितले. असे बहुतांश अर्ज उत्सवाच्या एक-दोन दिवस आधी येतात. हे सर्व तपासले गेले. त्याचे पालन न केल्यास दंडाची तरतूद आहे.Ganesh Chaturthi 2023

हेही वाचा: Maharashtra CM Eknath Shinde on Maratha Reservation: मराठवाड्यात मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार? पाहा काय म्हणाले मुख्यमंत्री.