Monday, February 26

Gautami Patil : गौतमी पाटीलच्या ‘त्या’ व्हायरल व्हिडीओ प्रकरणाची महिला आयोगानं घेतली दखल; रुपाली चाकणकर ट्वीट करत असं म्हणाल्या…

Last Updated on February 27, 2023 by Jyoti S.

Gautami Patil

गौतमी पाटील(Gautami Patil) व्हायरल व्हिडिओ प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्विट केले आहे.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.


लावणी नृत्यांगना गौतमी पाटीलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गौतमी एका कार्यक्रमात कपडे बदलत असताना तिचा एक व्हिडिओ गुपचूप रेकॉर्ड करण्यात आला आणि व्हायरल झाला. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्विट केले आहे.

गौतमी पाटीलची फोटो पाहण्यासाठी क्लिक करा


लावणी कलाकार गौतमी पाटील यांच्या चेंजिंग रूमचा एक खासगी व्हिडिओ गुपचूप चित्रित करून सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे. एकूणच महिलांवरील सायबर गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. हे प्रकार रोखण्यासाठी स्पेशल टास्क फोर्स स्थापन करून निषेध मोहीम राबवली तर गुन्हेगारांचे मनोधैर्य खच्ची होईल, असे रुपाली चाकणकर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

हेही वाचा: Viral Lion video : कोब्रा पाहून सिंहांना धक्का बसला, पुढे काय झाले ते पाहून तुम्ही थक्क व्हाल


महिला आयोगाने महिलांवरील सायबर गुन्हे रोखण्यासाठी कृती कार्यक्रम जाहीर करण्यासाठी पत्राद्वारे सायबर विभाग, पोलीस महानिरीक्षकांना कळवले आहे, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, कलाकार गौतमी पाटील एका कार्यक्रमासाठी कपडे बदलत असताना तिच्या मोबाईलमध्ये एक व्हिडिओ रेकॉर्ड झाला आणि व्हायरल झाला. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनेचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.

हेही वाचा: Viral cow video : शाळेतील हुशार कावळ्याची गोष्ट ऐकली आहे का? आता ‘त्याचा खरा व्हिडिओ पहा

Comments are closed.