Last Updated on January 9, 2023 by Jyoti S.
Green grass : रंगाची फवारणी करून गवत बनविले हिरवे
Table of Contents
इंदूर(Indore) : प्रवासी भारतीय दिव संमेलनासाठी इंदूर वेगाने सजवले जात आहे. शहरातील चौक हिरवेगार दिसावेत यासाठी महागडी रोपे, हिरवे गालिचे व गवत बसविण्यात आले आहेत. बापट क्रॉसिंग येथील गवताला पाणी न मिळाल्याने ते दोन दिवसांत पिवळे पडले.
महापालिकेतील अधिकारी तरी हार कशी मानतील?
त्यांनी हिरवळीसाठी हिरव्या रंगाची व्यवस्था केली. गवतावर हिरव्या(Green grass) रंगाची फवारणी केल्याने पिवळे पडलेले गवत हिरवेगार दिसू लागले.
हिरवे गवत दाखविण्याची इंदूर महापालिकेची ही कसरत इंदूरवासीयांमध्ये चर्चेचा(Green grass)विषय ठरली आहे.
सुखलिया गावातील चौकाचौकांत ज्या भागात हिरव्या रंगाची फवारणी करण्यात आली, तेथील भिंतही दोन दिवसांपूर्वी बांधण्यात आली आहे.
हेही वाचा: Human Composting : आता इथं बनवतात एका मृतदेहापासून ३६ बॅगा खत!!!
मात्र, जुन्या भिंतीला मातीचा भार सहन न झाल्याने तिला भेगा पडल्या होत्या. रस्त्याच्या मधोमध लावलेली काही रोपेही वाळून गेली आहेत.