Last Updated on December 24, 2022 by Jyoti S.
Instagram: इंस्टाग्रामवर मेसेज सुरक्षित आहेत का? ‘हे’ फिचर लगेच वापरा..
इंस्टाग्राम, फेसबुक असो की व्हॉट्सॲप या सोशल मीडिया ॲप्सच्या माध्यमातून आपण जवळच्या लोकांसोबत बोलू शकतो किंवा त्यांना पाहू शकतो आणि संभाषण करू शकतो. पण येथे आपली डिजिटल प्रायव्हसी असणं आवश्यक बनतं. कारण आजच्या काळात फसवणूक करणे आणि स्मार्ट डिव्हाइसेस हॅक करून डेटा चोरण्याचे काम हॅकर्स शिताफीने करत असतात.
इन्स्टाग्रामवर(Instagram) चॅट करण्यासाठी जर तुम्हाला डिजिटल प्रायव्हसी हवी असेल तर इंस्टाग्रामच्या एका फिचरचा तुम्हाला जास्त उपयोग होईल. जेणेकरून तुमचे इंस्टाग्राम(Instagram) चॅट सुरक्षित राहण्यास जास्तीत जास्त मदत होईल. सुरुवातीला अनेक समस्या आल्या पण गरज ओळखून हे फीचर कंपनीने आणलं होतं.
इंस्टाग्रामवर असणाऱ्या अनेक युजर्सना ‘एंड-टू-एंड एन्क्रिप्शन’ हे फिचर वापरायचं कसं हे माहीत नसतं किंवा कधी वापरलेलंही नसतं. तुमच्या चॅट सुरक्षित असाव्यात म्हणून या फिचरचा वापर करत जा. कंपनीकडून आणखी बेस्ट फीचर्स आणण्यासाठी पावले उचलली जात आहेत. तर जाणून घ्या एंड-टू-एंड एन्क्रिप्शन फिचर कसं सुरू करायचं..हेही वाच: Snake: समोर फणा काढून आला कोब्रा; बाळाने खेळणं म्हणून हातात धरला आणि अवघ्या 30 सेकंदात
एंड-टू-एंड एन्क्रिप्शन सुरु करण्यासाठी..
▪️तुमच्या स्मार्टफोनवर इंस्टाग्राम ॲप उघडा.
▪️ आता वरच्या बाजूस उजव्या कोपऱ्यातील चॅट/मेसेजच्या आयकॉनवर क्लिक करा.
▪️ यानंतर त्याच उजव्या कोपऱ्यात वर प्लस (+) या आयकॉनवर टॅप करा.
▪️ इथे ‘स्टार्ट एंड टू एंड एन्क्रिप्टेड चॅट’ ऑप्शनवर क्लिक करा.
आता हा ऑप्शन ओपन झाल्यावर तुम्हाला खाली तुमची फ़्रेंडस लिस्ट दिसेल तिथे ज्या व्यक्तींसोबत तुम्हाला बोलायचं असेल त्याच्या नावावर टॅप करून किंवा सर्च करून अकाउंट निवडा आणि चॅट करा.