मनेगाव येथे ग्राम दैवत खंडेराव महाराज यात्रा प्रारंभ

Last Updated on November 29, 2022 by Jyoti S.

आज यात्रा उत्सवाचा पहिला दिवस

सिन्नर: तालुक्यातील मानेगाव येथील ग्रामदैवत खंडेराव महाराजांचा दोन दिवशीय यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडत आहे. आज यात्रा उत्सवाचा पहिला दिवस . पहिल्या दिवशी भाविकांनी तसेच शाळकरी मुला- मुलींनी मोठ्या उत्साहात अनेक प्रकारची मनोरंजनात्मक खेळ खेळून आनंद लुटला . “येळकोट येळकोट जय मल्हार” म्हणत भाविक यात्रा उत्सवाचा आनंद लुटत होते. तसेच सकाळी शाळकरी मुलींनी आणि मुलांनी लेझीम खेळात यात्रेस प्रारंभ केला.

manegaon yatra4 Taluka Post | Marathi News

सनईच्या सुरत व ढोल ताश्याच्या गजरात कवडीधारकांचे आगमन झाले . यात्रा कमिटीचे अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष व इतर सदस्यांनी कवडीधारकाचे स्वागत केले. यात्रा कमिटीच्या वतीने कवडीधारकास टोपी टॉवेल देऊन सत्कार करण्यात आला .मानेगावला पहिल्या दिवशीच्या यात्रेत इतर आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी हजेरी लावले.या उत्सवात घोड्यांचा डान्स देखील दाखवण्यात आला.

manegaon yatra Taluka Post | Marathi News

manegaon yatra5 1 Taluka Post | Marathi News

कुलदैवताच्या दर्शनासाठी नोकरी व्यवसायानिमित्त बाहेरगावी स्थायिक झालेले सहकुटुंब दाखल झाल्याने घरोघरी आनंदाचे वातावरण होते . संपूर्ण गावामध्ये रांगोळीची सजावट करण्यात आलेली होती गाव अगदी सुशोभित दिसत होते.

manegaon yatra2 Taluka Post | Marathi News

वृक्षारोपणाचे वाटप

यात्रेचा पहिल्याच दिवशी नागरिकांनी वृक्षारोपण योजना देखील राबवली . यावेळी मनेगाव मधील यात्रा कमिटीचे अध्यक्ष, सरपंच,उपसरपंच तसेच ग्रामस्त यांच्या उपस्तितीत वृक्षारोपणाचे वाटपही झाले.

treeplantation yojna Taluka Post | Marathi News
treeplantation yojna2 Taluka Post | Marathi News

अतिशय सुंदर पद्धतीने यात्रा उत्सवाचा प्रारंभ झाला.तसेच अजून यात्रा उत्सवाची नवनवीन माहिती आम्ही आपल्या सोबत घेऊन येणार आहोत यात्रेचा दुसऱ्या दिवशी.
शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत जाणून घेण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा