Last Updated on December 20, 2022 by Jyoti S.
Motivational : म्हणून गाढ झोपेतही पक्षी खाली पडत नाहीत
लंडन(Motivational) : जेव्हा आपण गाढ झोपेत असतो तेव्हा आसपास कोणत्या गोष्टी घडत आहेत हे आपल्याला कळत नाही. कारण, त्यावेळी आपण डाराडूर झोपलेलो असतो. कधी बसमध्ये, कधी रेल्वेच्या डब्यात; तर कधी ऑटो रिक्षामध्ये आपण झोपलो की, आपली मान आपसूक खाली वळते. मनुष्य हा झोपेत असताना स्वतःला संतुलित ठेवू शकत नाही. पक्ष्यांची मात्र बातच निराळी. पक्ष्यांच्या बाबतीत असे काही होत नाही.
सगळे झाडावर झोपणारे सगळे पक्षी झाडावरून कधीच खाली पडत नाहीत, याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? यामागचे कारण जाणून घेतले पाहिजे. माणसांप्रमाणेच पक्ष्यांनाही जास्त वेळ झोपण्याची गरज नसते. पक्ष्यांना गाढ झोपेत जाण्यासाठी लागणारा वेळ अवघा १० सेकंदांपर्यंत असतो. पक्षी एक डोळा उघडून झोपू शकतात, हे जाणून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल.
पक्ष्यांमध्येही अशा विशेष शक्ती असतात की, त्यांचा वापर करून ते झोपेतही सक्रिय राह शकतात. पक्ष्यांच्या बाबतीत त्यांच्या मेंदूचा भाग झोपेत असताना सक्रिय राहतो. याउलट त्यांचे डोळे उघडतात. म्हणजेच, जर त्यांचा उजवा गोलार्ध सक्रिय असेल, तर त्यांचा डावा डोळा उघडा राहील. झोपेत असतानादेखील पक्षी कोणत्याही धोक्यापासून स्वतःचे संरक्षण करू शकतात; कारण त्यांच्या मेंदूचा एक भाग सक्रिय राहतो.हेही वाचा: Snake: समोर फणा काढून आला कोब्रा; बाळाने खेळणं म्हणून हातात धरला आणि अवघ्या 30 सेकंदात
झोपेत असतानाही पक्षी(Motivational) कोणत्याही शिकारीपासून स्वतःला वाचवू शकतात. एवढेच नव्हे, तर पक्ष्यांच्या पायाच्या रचनेमुळे ते झाडाच्या फांदीवर आरामात राहू शकतात. पक्षी हे झोपण्यासाठी झाडाच्या फांदीवर बसतात तेव्हा त्यांच्या पंजाची रचना हि त्यांना फांद्यांची चांगली पकड करण्यास मदत करते. त्यामुळे पक्षी गाढ झोपेत असले, तरीही झाडावरून खाली पडत नाहीत.