
Last Updated on November 28, 2022 by Jyoti S.
न्यूयॉर्क : पुरुष आणि महिला यांच्या सौंदर्याचे निकष भीन्न आहेत. पुरुष हा आडदांड, दाढी-मिशा असलेला तर महिला नाजूक बांध्याची शरीरावर दाट केस नसलेली असावी, अशी मान्यता आहे; पण कधी कधी काही जनुकीय दोषांमुळे स्त्रियांच्या चेहऱ्यावर पुरुषांसारख्या दाढी-मिशा उगवू लागतात. अशा स्त्रियांसाठी हा एक शाप ठरतो; पण अमेरिकेतील एक अशी महिला आहे की जिच्या चेहऱ्यावर पुरुषांसारख्या दाढी-मिशा उगवतात. तिच्या चेहऱ्यावरील केस एवढ्या वेगाने वाढतात की या महिलेला
दिवसातून दोन वेळा दाढी करावी (शेव्हिंग) लागते. मात्र महत्त्वाची बाब म्हणजे या महिलेला त्याचे काहीही वाईट वाटत नाही. उलट त्याचा तिला गर्व वाटतो.

डकोटा कूक असे या महिलेचे नाव आहे. डकोटाला ‘बियर्ड लेडी’ असे म्हटले जाते. डकोटाला वयाच्या १३ व्या वर्षापासून चेहऱ्यावर दाढी-मिशा उगवू लागल्या. आता डकोटा तीस वर्षांची आहे. डकोटा अमेरिकेच्या लास वेगास शहरात राहते.