Last Updated on February 1, 2023 by Jyoti S.
Pathan Movie : पठाणच्या 500 कोटींच्या कमाईनंतर शाहरुखसह चित्रपटाची संपूर्ण टीम पहिल्यांदाच मीडियासमोर आली आहे. यावेळी शाहरुख आणि दीपिकाने प्रेक्षकांशी संवाद साधला.
थोडं पण महत्वाचं
मुंबई, ३० जानेवारी : शाहरुख खानचा ‘पठाण'(Pathan Movie) चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमालीची कमाई करत आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोण(Deepika padukone) आणि शाहरुख खान(Sharukh khan) मुख्य भूमिकेत आहेत. ‘बेशरम रंग’ या गाण्यामुळे हा चित्रपट वादात सापडला होता. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट कितपत कमाई करेल याविषयी शंका होत्या, पण पहिल्या दिवसापासून चित्रपटाने चांगलीच ओपनिंग केली.
पठाणच्या(Pathan Movie) 500 कोटींच्या कमाईनंतर शाहरुखसह चित्रपटाची संपूर्ण टीम पहिल्यांदाच मीडियासमोर आली आहे. यावेळी शाहरुख आणि दीपिकाने प्रेक्षकांशी संवाद साधला. चित्रपटातील अनुभव कथन करताना दीपिका सर्वांसमोर भावूक झाली आणि तिच्या डोळ्यात पाणी आले.
बेशरम रंग या गाण्यात बिकिनी घातल्यामुळे दीपिकाला प्रचंड ट्रोल करण्यात आले होते. पठाण हा चित्रपट दीपिका आणि शाहरुख या दोघांच्याही कारकिर्दीतील महत्त्वाचा चित्रपट होता. या चित्रपटाबद्दल बोलताना दीपिका म्हणाली, ‘मी शाहरुखसोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण हा चित्रपट माझ्यासाठी खूप वेगळा होता. अनेकांना माहीत आहे की, जेव्हा मी कोणत्याही गोष्टीत आनंदी असते तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी येते,’ असं म्हणत दीपिका भावूक झाली.
हेही वाचा: salman khan marriage : अखेर आता सलमान खान चढणार बोहल्यावर…या अभिनेत्रीसोबत तो बांधणार लग्नगाठ?
दीपिका पुढे म्हणाली, शाहरुख आणि मी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. आम्ही अनेक चित्रपटांमध्ये रोमँटिक सीन केले आहेत पण या चित्रपटात आम्ही फायटिंग सीन्सही केले आहेत. त्यामुळे माझ्यासाठी हा चित्रपट इतर चित्रपटांपेक्षा खूप वेगळा आणि महत्त्वाचा होता. पुढे वाचण्यासाठी क्लिक करा