Pelora HSC board exam : अगं बाई किती भयानक!!बारावीच्या परीक्षा केंद्रावर मधमाश्यांचा हल्ला तीन विद्यार्थी व शिक्षक जखमी राजुरातील पेलोरा येथील घटना

Last Updated on March 2, 2023 by Jyoti S.

Pelora HSC board exam

Pelora HSC board exam : सास्ती (चंद्रपूर,chandrapur) राजुरा तालुक्यातील संजय गांधी कनिष्ठ महाविद्यालय(Sanjay gandhi kanishta mahavidyalay), पेलोरा(pelora) येथील बारावीच्या परीक्षा केंद्राच्या प्रवेशद्वाराजवळ एका झाडावरील मधमाशांनी अचानक हल्ला चढविल्यामुळे तीन विद्यार्थी व एक शिक्षक जखमी झाले.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

ही घटना बुधवारी सकाळी १०:३० वाजण्याच्या सुमारास घडली. त्यामुळे परीक्षा केंद्रावर गोंधळ उडाला. जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी कढोली (बु.) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल करण्यात आले.

मधमाश्यांना घालवण्यासाठी काय युक्ती केली पहा क्लिक करून

बुधवारी इयत्ता बारावीचा रसायनशास्त्र व्होकेशनलव(vocationlove) विषयाचा पेपर होता. सकाळी ११ ते दुपारी २ या कालावधीत पेपर असल्यामुळे विद्यार्थी परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी प्रवेश करत असताना प्रवेशद्वाराजवळच असलेल्या एका झाडावरील मधमाशांनी विद्यार्थ्यांवर हल्ला चढवला. त्यामुळे सर्वत्र गोंधळ उडाला. यात मधमाशांनी जास्त चावा घेतल्यामुळे तेथील तीन विद्यार्थ्यांना गंभीर दुखापत झालेली आहे .

हेही वाचा: Prajakta mali : त्यांच्यामुळे मी लग्न करत नाहीये… शेवटी प्राजक्ता माळीने कारण सांगितले


यात सुरज भिमनकर(Suraj bhimankar)तेजस मुके(Tejas muke) हे गंभीर जखमी झाल्यामुळे उपचारासाठी त्यांना तत्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले

Comments are closed.