Last Updated on December 30, 2022 by Jyoti S.
Robot-2023: आता खा रोबोटच्या हातचे अन्न !!
२०२३ चे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. आगामी वर्षात खाद्यपदार्थ आणि पेयांमध्ये कोणत्या गोष्टी ट्रेंडिंग असतील याची जोरदार चर्चा समाजमाध्यमांत(Robot-2023) सुरू आहे. अनेक वर्तमानपत्रे, मासिके आणि न्यूज चॅनल्समध्ये २०२३ सालच्या ट्रेंडिंग गोष्टींच्या याद्या प्रसिद्ध होत आहेत.
अमेरिका, इंग्लंड, युरोप आणि भारतीय उपखंडातही खाद्यपदार्थ व उपाहारगृहांशी संबंधित व्यावसायिक कित्येकदा या याद्या प्रसिद्ध करतात. त्यांच्याकडे कोणत्या गोष्टींची विक्री वाढली आहे, कोणत्या पदार्थांची मागणी वाढली आहे आणि खाद्य व्यवसायात कोणते नवे प्रयोग होत आहेत अशा अनेक गोष्टींचा विचार करून या याद्या प्रसिद्ध केल्या जातात.
त्यातल्या काहीजणांचे म्हणणे आहे की, येणारे वर्ष आर्टिफिशियल इंजेलिजन्सचे(of Artificial Intelligence) असेल. आता रोबोट(Robot-2023) उपाहारगृहात आलेल्यांना फक्त मेन्यू सर्व्ह करणार नाहीत तर खाद्यपदार्थ बनवताना घटकपदार्थ किती प्रमाणात घ्यायचे, किती लोकांसाठी तयारी करायची असे निर्णय घ्यायलाही मदत करतील.
खाद्यपदार्थ जर रोबोट्सने बनवले तर रेसिपी तंतोतंत फॉलो केली जातेच.
पण पदार्थांची सजावटही अगदी नेटकी होते, पेयांचा विचार केला तर एक सर्व्हे सांगतो की, आगामी वर्ष कॉकटेल्सचे असेल. लोक फक्त मद्यापेक्षा कॉकटेल्सना प्राधान्य देतील.
कॉकटेल्स सहज विकता येतात, अनेक प्रकारच्या चवींची कॉकटेल्स बनवता येतात आणि यावर्षी अनेकांनी कॉकटेल्स पिणे पसंत केले हे यामागचे कारण आहे.हेही वाचा : Mobile users: मोबाईल युजर्सना धक्का, 31 डिसेंबरनंतर ‘या’ मोबाईलवर ‘व्हाॅट्स अॅप’ बंद होणार…
बरोबरीने मॉकटेल्सचीही मागणी वाढेल. नवनव्या पदार्थांच्या शोधात खवय्ये सोशल मीडियाकडे वळतील. हा ट्रेंडही २०२३ मध्ये अपेक्षित आहे. सोशल मीडियावर सध्या खाद्यपदार्थाचे रील्स खूप लोकप्रिय आहेत.
एका सर्व्हेनुसार अर्ध्याअधिक लोकांच्या(Robot-2023) घरी ते जे रील्स बघतात, त्यातील घटकपदार्थ सहज उपलब्ध असतात, तर उरलेले अर्धे लोक जर तो पदार्थ परवडणारा असेल तरच तो घरी बनवण्याचा विचार करतात.
म्हणजे जर तुम्ही २०२३मध्ये फूड रील्स बनवणार असाल तर विचार करा, पदार्थ साधा हवा आणि बनवताना पैसे फार खर्च व्हायला नकोत. सोशल मीडिया वापरणारे जरी स्वस्त खाण्याच्या शोधात असले तरी अतिश्रीमंत लोक येणाऱ्या वर्षात उपाहारगृहांपेक्षा प्रायव्हेट डायनिंग क्लबना पसंती देतील.