Last Updated on January 12, 2023 by Jyoti S.
shinde : काल यात्रा उत्सवाचा दुसरा दिवस
Table of Contents
चांदवड(Chandwad) : सालाबादप्रमाणे याही वर्षी चांदवड तालुक्यातील शिंदे(Shinde) येथील ग्रामदैवत खंडेराव महाराजांचा दोन दिवशीय यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात काल दिनांक ११-जानेवारी रोजी पार पडला.
पहिल्या दिवशी भाविकांनी तसेच शाळकरी मुला- मुलींनी मोठ्या उत्साहात देवाचे दर्शन घेतले. “येळकोट येळकोट जय मल्हार” म्हणत भाविक आणि ग्रामस्त यात्रा उत्सवाचा आनंद लुटत होते.

चांदवड तालुक्यातील शिंदे येथील ग्रामदैवत खंडेराव महाराजांचा दोन दिवशीय यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात काल दिनांक ११-जानेवारी रोजी पार पडला.पहिल्या दिवशी भाविकांनी तसेच शाळकरी मुला- मुलींनी मोठ्या उत्साहात देवाचे दर्शन घेत होते . “येळकोट येळकोट जय मल्हार” म्हणत भाविक यात्रा उत्सवाचा जोरदार पने आनंद लुटत होते.
यात्रा उत्सवासाठी कमिटी नेमण्यात आलेली होती. त्या कमिटीमधील मेंबर खालीलप्रमाणे-

सनईच्या सुरात कवडीधारकांचे आगमन झाले . तेथील गावच्या यात्रा कमिटीचे अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष व इतर सदस्यांनी कवडीधारकाचे मनापासून स्वागत केले. यात्रा कमिटीच्या वतीने कवडीधारकास टोपी टॉवेल देऊन सत्कार करण्यात आला .
शिंद्याला पहिल्या दिवशीच्या यात्रेत इतर आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी देखील हजेरी लावली .या उत्साहात बारा गाड्या बैलगाडी ओढण्याचा कार्यक्रम देखील छान पद्धतीने पार पडला .
कुलदैवताच्या दर्शनासाठी नोकरी व्यवसायानिमित्त बाहेरगावी स्थायिक झालेले सहकुटुंब दाखल झाल्याने घरोघरी खूपच आनंदाचे वातावरण होते .यात्रेमुळे गाव अगदी सुशोभित दिसत होते.
यात्रेमध्ये विविध प्रकारची दुकाने लागलेली होती .आणि त्या दुकानांमधून शॉपिंग करण्यासाठी बायकांनी खूपच गर्दी केली होती.
दुसऱ्या दिवशी टांगे(Hang on) शर्यत स्पर्धा देखील लावण्यात आलेली होती. या स्पर्धेत प्रथम आणि द्वितीय विजेत्यास ग्रामस्थांच्या वतीने बक्षिसे देखील ठेवण्यात आलेली होती. हे गाव अगदी छोटा असून तिथल्या ग्रामस्थानी अगदी शिस्तबद्ध पद्धतीने यात्रा उत्सवाचा आनंद लुटला आणि पूर्ण गावाला सहकार्य केले त्यांचे गावाच्या वतीने मनापासून आभार !!!
अतिशय सुंदर पद्धतीने यात्रा उत्सवाचा प्रारंभ होऊन काल शेवट झाला .