Last Updated on December 24, 2022 by Jyoti S.
The lion king : आधी मागे वळून पाहा अन् पुढे जा
बदलत्या तंत्रज्ञानामुळे दिवसेंदिवस सांस्कृतिक, व्यावसायिक कार्यक्रमांमध्येही मोठे बदल दिसून येत आहेत. कोणताही सोहळा चर्चेत राहावा यासाठी मोठे पोस्टर, एलईडी, डिजिटल वॉल असे नियोजन अगदी व्यासपीठावरही दिसते. मात्र शहरातील एका व्यासपीठावर प्रमुख पाहुण्याच्या आसन व्यवस्थेच्या मागे मोठ्या डिजिटल वॉलचे नियोजन केलेले असताना समोर मात्र एलईडी लावण्याचे मंच व्यवस्थापक बहुधा विसरल्याने कार्यक्रम रंगात असताना कार्यक्रम आयोजकांच्या संस्थेच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांचा व्हिडीओ संदेश लावण्यात आला.
परंतु, तो प्रमुख पाहुण्यांनाच दिसेनासा झाला. त्यामुळे प्रमुख पाहुणे सिंहावलोकन करताय की काय, असा विनोद एका उपस्थिताने केला. त्यामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.