Trimbakeshwar: बिबट्याने जंगलात ओढून नेलेला बालक मृतावस्थेत

Last Updated on December 25, 2022 by Jyoti S.

Trimbakeshwar: त्र्यंबकेश्वर तालुक्यातील थरारक घटना

Trimbakeshwar: घटनेनंतर वनपरिक्षेत्राच्या तीन पथकासह वनपरिक्षेत्र आधिकारी विवेक भदाणे, केतन बिरारीस यांनी घटनास्थळ गाठले. ग्रामस्थांच्या मदतीने जंगलात रात्रीच्या अंधारात बेपत्ता मुलाचा शोध सुरू होता. रात्री दहा वाजेच्या सुमारास मृतदेह शोधून काढण्यास वनाधिकारी, कर्मचाऱ्यांना यश आले. नवीन तरतुदीनुसार मुलाच्या वारसांना आर्थिक मदत देण्यात येईल व वेळूजे शिवारात पिंजरे तैनात करून बिबटे जेरबंद करण्यात येतील असे वरिष्ठ वन आधिकारी यांनी सांगितले.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

वेळुंजे त्र्यंबकेश्वर(Trimbakeshwar) तालुक्यातील : वेळुंजे येथे शनिवार (दि. २४) रोजी निवृत्ती दिवटे यांच्या सहा वर्षांच्या मुलावर बिबट्याने हल्ला करत त्याला जंगलाच्या दिशेने ओढून नेल्याची थरारक घटना सायंकाळी घडली. रात्री उशिरार्यंत या बालकाचा शोध सुरू असताना घरापासून काही. अंतरावर या बालकाचा मृतदेह आढळून आल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.हेही वाच:बिबट्याने केल्या 200 कोंबड्या ठार!

वेळुंजे येथे निवृत्ती दिवटे यांचे मळ्यात वास्तव्य आहे. शनिवार (दि. २४) रोजी सायंकाळी ७. वाजेच्या सुमारास दबा धरून बसलेल्या ‘ बिबट्याने ‘ Trimbakeshwar अंदाज घेत घराच्या दरवाजात उभ्या असलेल्या सहा वर्षाच्या आर्यश या बालकाला लक्ष्य करत हल्ला चढवला. बिबट्या एवढ्यावरच न थांबता त्याने या बालकाला उचलून नेत जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. बालक आणि बिबट्या यांच्यातील झटपट बालकाच्या छोट्या बहिणीने पहिल्यानंतर ती घाबरून जोरात किंचाळली. तिने आरडाओरड केल्याने हा आवाज ऐकताच घरातील माणसे जमा होण्याआधीच बिबट्या जंगलाच्या दिशेने निघून गेला होता. मळ्यातील नागरिकांनी या घटनेची. माहिती गावातील अन्य गामस्थांना कळवल्यानंतर रात्री उशिरायत या बालकाचा शोध सुरू होता. सुमारे तासाभराच्या शोधानंतर घरापासून काही अंतरावर हा बालक मृतावस्थेत आढळून आल्याने हळहळ व्यक्त होत आहे.