Last Updated on January 20, 2023 by Jyoti S.
Viral muncky video : भांडी धुताना घाण पाणी तुंबू नये याची काळजी घेण्याऐवजी हे माकड घाण पाण्यात बसलेले दिसत आहे.
थोडंस पण कॉमेडी
सध्या सोशल मीडियावर प्राण्यांचे वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. व्हिडिओमध्ये आपण मुक्या प्राण्यांचे वेगवेगळे गुण पाहू शकतो. अलिकडच्या काळात असे दिसून आले आहे की व्हायरल होत असलेले बहुतेक व्हिडिओ हे माकडांचे आहेत.
कारण नुकताच एक माकड(Viral muncky video) आपल्या मालकिणीला मदत करण्यासाठी सोयाबीन तोडत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्याचप्रमाणे आता घरातील कामे करताना माकडाचा आणखी एक अप्रतिम व्हिडिओ व्हायरल होत आहे. या माकडाचे तुम्ही कौतुक कराल यात शंका नाही.
व्हिडिओ पहा
आणखी धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सध्या माकडाचा असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक माकड घरातील आवश्यक भांडी धुताना दिसत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये माकड स्वयंपाकघरात भांडी धुताना दिसत आहे. त्याची भांडी धुण्याची पद्धत अनोखी आहे आणि त्याला भांडी धुताना पाहून अनेकांना आपले हसू लपवणे कठीण झाले आहे.
व्हिडिओमध्ये माकड(Viral muncky video) आधी साबणाच्या पाण्याने भांडी धुत आहे, नंतर भांडी साफ करत आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गंमत म्हणजे भांडी धुताना पाण्याचा शरीराला स्पर्श होणार नाही याची काळजी घेण्याऐवजी हे माकड घाण पाण्यात बसून भांडी धुत आहे.
हेही वाचा: Viral monkey video :किंग कोब्रासोबत माकडाची टक्कर, चावल्यावर हे केले…, पाहा व्हिडिओ
आयपीएस रुपिन शर्मा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर व्हायरल होत असलेल्या या माकडाचा व्हिडिओ शेअर केला आहे. भांडी धुवणाऱ्या या माकडाचा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांना लॉकडाऊनची वेळ आठवली आहे. कारण, लॉकडाऊन दरम्यान अनेक मीम्स व्हायरल होत होते ज्यात विवाहित पुरुष बरीच भांडी धुत होते.