Last Updated on December 27, 2022 by Jyoti S.
Viral trending video: श्रीखंड घ्या, हरी भूखंड घ्या…
यंदाचे हिवाळी अधिवेशन विरोधकांनी सभागृहापेक्षा सभागृहाच्या बाहेर जास्तच गाजवले. एकही दिवस असा गेला नाही, की विरोधकांनी – सभागृहाबाहेरील पायऱ्यांवर येऊन आंदोलन केले नाही. या आंदोलनातून सरकारच्या विरोधात वैविध्यपूर्ण घोषणा बघायला मिळाल्या.
पण, सोमवारी विरोधकांनी या घोषणांची आरतीच सभागृहाबाहेर गायली viral trending video ‘श्रीखंड घ्या, हरी भूखंड घ्या हो…. गायरान घ्या, कुंणी भूखंड घ्या’, ‘गद्दार बोलो बोलो, सत्तार बोलो’, “शिंदेंनी घ्या, सत्तारांनी घ्या…’, शब्दांची अशी जोडणी करून विरोधकांनी आरतीच्या रूपात चांगलीच फोडणी दिली. ते सुरात गायल्याने विरोधाचा रंग आणखी गडद झाला.
आणि ते सर्व बघून आता एक लहान पोरगा सुद्धा आव्हाड साहेबांचं ऐकून म्हणायला लागलं. श्रीखंड घ्या भूखंड घ्या!!!