Last Updated on December 14, 2022 by Taluka Post
whatsapp: व्हॉट्स अॅप.. जगात सर्वाधिक वापरले जाणारे अॅप.
आपल्या युजर्ससाठी व्हॉट्सअॅप कडून कायम नवीन -नवीन फिचर्स हे सादर केले जातात. आगामी नवीन वर्षात म्हणजेच 2023 मध्येही या अॅपमध्ये धमाकेदार फीचर्स येणार आहेत.
व्हॉट्स अॅपमध्ये येणारे फीचर्स
▪️ येत्या वर्षभरात व्हॉट्स अॅपमध्ये कॉल रेकॉर्डिंगचे फीचर्स येऊ शकते. सर्वात विशेष म्हणजे, समोरची व्यक्ती आपला कॉल रेकॉर्ड करतेय, हे आपल्याला कळणारही सुद्धा नाही. युजर्संना कॉल रेकॉर्डिंग फीचर डिसेबलही करता येईल.
▪️ व्हॉट्स अॅपमध्ये आता एडिट मेसेज फीचर येईल. त्यामुळे यूजर्सना ऑटो डिलीट, डिलीट मेसेज, तसेच मेसेज एडिटचीही सुविधा मिळेल. मेसेज पाठवल्यानंतर 5 मिनिटांतच एडिट करता येईल.Snapchat चे नवीन AR वैशिष्ट्य निर्मात्यांना पैसे कमविण्याची संधी देईल
▪️ मेसेज शेड्यूल करण्याचाही पर्याय मिळणार आहे. त्यामुळे ऑफिसच्या कामासाठी जे लोक हे अॅप वापरतात किंवा जे जास्त अॅक्टिव्ह असतात, त्यांच्यासाठी हे फिचर खूप उपयुक्त ठरणार आहे.
▪️ आता अनसेंड फीचर येणार असून, युजरने मेसेज अनसेंड करताच समोरच्या व्यक्तीच्या चॅटमधून तो गायब होईल.