FIFA World Cup Breaking: फायनलमध्ये ‘हे’ संघ भिडणार, मेस्सीने केली निवृत्तीची घोषणा..?

Last Updated on December 15, 2022 by Jyoti S.

FIFA World Cup Breaking: फायनलमध्ये ‘हे’ संघ भिडणार.

फिफा(FIFA World Cup Breaking) विश्वचषक स्पर्धेत दुसऱ्या सेमी फायनलमध्ये फ्रान्सने मोरोक्कोवर 2-0 ने विजय मिळवला आहे. या विजयासह फ्रान्स संघाने फिफा स्पर्धेतील फायनल मध्ये प्रवेश मिळवला आहे. तर यापूर्वीच फिफा विश्वचषक 2022 मध्ये फायनलमध्ये पोहोचणारा अर्जेंटिना पहिला संघ बनला आहे.

अर्जेंटिना संघाचा कर्णधार लिओनेल मेस्सीचे जगभरात मोठे फॅन्स आहेत. याशिवाय फ्रान्स देखील एक तगडा संघ आहे. अर्जेंटिनाने क्रोएशियावर 3-0 अशी मात करत सहाव्यांदा विश्वचषक 2023 च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. तर सलग दुसऱ्यांदा व एकूण चौथ्या वेळी फ्रान्स संघ फिफाच्या फायनलमध्ये खेळणार आहे.

आमचा WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

फायनल कधी व कुठे पाहता येणार..?

फिफा विश्वचषक स्पर्धा(FIFA World Cup Breaking) 2022 मधील अंतिम सामना फ्रान्स आणि अर्जेंटिना या संघांमध्ये होणार असून येत्या रविवार (18 डिसेंबर) रोजी रात्री 8.30 वाजता सामना सुरू होईल. एमटीव्ही एचडी, स्पोर्ट्स 18-1, स्पोर्ट्स 18 खेल या चॅनल्सवर आणि जिओ सिनेमावर चाहत्यांना फुटबॉल विश्वचषकातील फायनलचा आनंद घेता येणार आहे.

स्पेनने कोस्टा रिकाला ७-० ने पराभूत केले, त्यांचा आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय

लियोनेल मेस्सीची निवृत्तीची घोषणा..?

अर्जेंटीना फुटबॉल संघाचा कर्णधार आणि दिग्गज लियोनेल मेस्सी याने मोठी घोषणा केली असून तो यंदाच्या विश्वचषकात अर्जेंटिनाकडून फायनल खेळल्यानंतर निवृत्ती घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. मेस्सीने सध्याच्या विश्वचषकात आतापर्यंत 5 गोल केले आहेत. अर्जेंटिनाच्या सिनिअर संघाकडून त्याने 90 गोल केले आहेत. मेस्सीने अर्जेंटिनासाठी आतापर्यंत 4 वर्ल्डकप खेळले आहेत. त्याने 2005 मध्ये राष्ट्रीय संघाकडून सुरुवात केली होती. मेस्सीने 164 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

Comments are closed.