Last Updated on December 16, 2022 by Jyoti S.
Cricket :रोहित शर्माच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट.
भारत विरुद्ध बांगलादेशमधील दोन कसोटी(Cricket ) सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना चितगाव येथे झाला आहे. दुखापतीमुळे कॅप्टन रोहित शर्मा या सामन्यात खेळत नसून, त्याच्या जागी केएल राहुल याच्याकडे नेतृत्वाची जबाबदारी दिली आहे.
आमचा WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
दुसरी कसोटी खेळणार का?
बांगलादेशविरुद्ध((Cricket ) मीरपूर येथील मैदानावर 22 ते 26 डिसेंबर दरम्यान दुसरा कसोटी सामना होणार आहे. या मॅचआधीच भारतीय संघासाठी आनंदाची बातमी आली आहे. कॅप्टन रोहित शर्मा हा दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. हेही वाचा : FIFA World Cup Breaking: फायनलमध्ये ‘हे’ संघ भिडणार, मेस्सीने केली निवृत्तीची घोषणा..?
हाताच्या अंगठ्याला झालेल्या दुखापतीतून रोहित शर्मा सावरला असून, दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी तो संघात परतणार आहे. आज किंवा उद्याच (शनिवारी) तो बांगलादेशला रवाना होणार असल्याचेही समजते.
दरम्यान, रोहितच्या गैरहजेरीत केएल राहुल याने भारतीय संघाचे चांगले नेतृत्व केले. पहिल्या डावात शानदार बॅटिंग करताना, बांगलादेश 150 धावांत गुंडाळले. सध्या भारतीय संघ मजबूत स्थितीत असून, पहिली कसोटी जिंकण्याची आशा आहे.