Last Updated on December 23, 2022 by Jyoti S.
Subsidy for dairy business: केंद्र सरकारची राष्ट्रीय गोकुळ मिशन योजना
राष्ट्रीय गोकुळ मिशन (आरजीएम) अंतर्गत ५० लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना दुग्ध(Subsidy for dairy business) व्यवसायासाठी ५० टक्के अनुदान दिले जाणार आहे. ही पुर्ण माहिती केंद्रीय पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री डॉ. संजीव बल्यान यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना दिली. प्रामुख्याने तरुण शेतकऱ्यांसाठी ही योजना लाभदायी असल्याचे सांगून बल्यान म्हणाले की, कोरोना संकटकाळापासून कृषी आणि दुग्ध व्यवसाय क्षेत्रात नवीन स्टार्टअप्स सुरू झाले आहेत.
या क्षेत्रात नवीन व्यवसायदेखील वाढत आहेत. राष्ट्रीय गोकुळ मिशन योजनेअंतर्गत सरकार गाय, म्हैस, कोंबडी, शेळी आणि वराहपालनाचा व्यवसाय करण्यासाठी ५० टक्के अनुदान य देणार आहे. या माध्यमांद्वारे मत्स्यपालन, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय क्षेत्रात ५० लाखांहून अधिक लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष पद्धतीने रोजगार उपलब्ध केले जाणार आहेत.हेही वाचा: Zero tillage: जीरो टिलेज मशागत यंत्रावर 80% पर्यंत अनुदान मिळेल, असा लाभ घ्या.
देशी गाईंच्या संगोपनास चालना देशी गाईंच्या(subsidy for dairy business) संगोपनाला चालना दिली जात आहे. त्यासाठी आता राज्य सरकारने प्राण्यांच्या उपचारासाठी देशभरात ४ हजार ३३२ पशुवैद्यकीय केंद्रे स्थापन करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. आपण शेतकरी किंवा व्यावसायिक सरकारच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन देखील याबद्दल अधिक माहिती मिळवू शकतात. गेल्या काही काळामध्ये दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची मागणी देखील वाढली आहे. या व्यवसायातून चांगला फायदा मिळू शकतो.
त्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, अशी अपेक्षा बल्यान यांनी व्यक्त केली. त्याचप्रकारे पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाकडून राबविण्यात येत असलेल्या अन्य योजनांची माहिती देखील त्यांनी दिली.