समुद्रकिनारी सापडली कोट्यवधी रुपये किमतीची अंगठी

Last Updated on November 24, 2022 by Jyoti S.

फ्लोरिडा : फ्लोरिडामधील – एक व्यक्ती सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्यक्तीला समुद्रकिनाऱ्यावर वाळूमध्ये गाडलेली एक कोट्यवधी रुपये किमतीची अंगठी सापडली आहे. प्लॅटिनम धातूची ही अंगठी हिरेजडित आहे. या अंगठीची किंमत सुमारे ४० हजार डॉलर एवढी आहे. कोणालाही जर अशी कोट्यवधी रुपयांची मौल्यवान वस्तू सापडली तर त्याला आभाळाएवढा आनंद होणे स्वाभाविक आहे. पण या व्यक्तीच्या बाबतीत गोष्ट थोडी वेगळी आहे. त्याने त्या अंगठीचे मूल्य जाणूनदेखील अंगठी मूळ मालकाला परत केली आहे.

जोसेफ कूक असे या भाग्यवान व्यक्तीचे नाव आहे. जोसेफ ३७ वर्षांचे आहेत. मेटल डिटेक्टरच्या साह्याने हॅमॉक बीचवर काही धातूंचा शोध घेत होते. त्यावेळी त्यांना ही अंगठी वाळूखाली गाडलेली असल्याचे संकेत मेटल डिटेक्टरने दिले. त्यानुसार जोसेफ यांनी त्याठिकाणी हातानेच थोडेसे खोदकाम केले असता अंगठी नजरेस पडली. त्यांना धातूंची पारख असल्याने ती अंगठी प्लॅटिनम या सोन्याहून महाग असलेल्या धातूची असल्याचे समजले. त्यावर बसवण्यात आलेला हिरादेखील नैसर्गिक हिरा होता. क्षणभर तेही या अचानक झालेल्या धनलाभामुळे गोंधळून गेले. पण लगेचच स्वतःला सावरत त्यांनी त्यांच्या पद्धतीने शोध घेत त्या अंगठीच्या मालकाचा माग काढला आणि अंगठी त्याच्या हाती सुपूर्द केली. हेही वाचा : सौदी समुद्रात बनवणार जगातील पहिले तरंगते शहर